शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

पेंचच्या जंगल सफारीत जिप्सीचालक, गाईड अन् पर्यटकांना मोबाईल बंदी, त्या घटनेमुळे निर्णय

By दयानंद पाईकराव | Updated: January 6, 2025 15:19 IST

Pench Tiger Reserve: उमरेड-पवनी-कन्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध एफ-२ वाघिणीला तिच्या बछड्यांसह समोरुन व मागून घेरल्याच्या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली होती. या घटनेची गांभीर्याने नोंद घेत वन विभागाने जंगल सफारीत जिप्सी चालक, गाईड व पर्यटकांना मोबाईलचा वापर करण्यावर बंदी घातली आहे.

- दयानंद पाईकराव नागपूर - उमरेड-पवनी-कन्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध एफ-२ वाघिणीला तिच्या बछड्यांसह समोरुन व मागून घेरल्याच्या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली होती. या घटनेची गांभीर्याने नोंद घेत वन विभागाने जंगल सफारीत जिप्सी चालक, गाईड व पर्यटकांना मोबाईलचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. तसेच घटनेत सामील जिप्सी चालकांना २५ हजार तर गाईडला १ हजारांचा दंड ठोठावला आहे. घटनेच्या वेळी जिप्सीत बसलेल्या सर्वच पर्यटकांना भविष्यात पेंचमध्ये पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. वन विभागाने धडाक्यात केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

३१ डिसेंबर २०२४ रोजी उमरेड-पवनी-क-हांडला अभयारण्यात जिप्सी चालकांनी एफ-२ वाघिणीला तिच्या बछड्यांसह समोरुन व मागून घेरले होते. या घटनेचा फोटो व्हायरल झाला आणि खळबळ उडाली होती. वाघिणीला घेरणे हा भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने ४ जिप्सी चालक व ४ गाईडला ७ दिवसांसाठी निलंबीत केले होते. तर जिप्सी चालकांना २ हजार ५०० रुपये व गाईडला ४५० रुपये दंड आकारला होता. या प्रकरणी वन विभागाने या शिक्षेत वाढ केली असून ४ जिप्सी चालक व ४ गाईडचे ३ महिन्यांसाठी निलंबन केले आहे. तर जिप्सी चालकांना २५ हजार व गाईडला १ हजार रुपये दंड ठोठावून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व उपाययोजना सुचविण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभु नाथ शुक्ला यांनी जारी केले आहे.

एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मोबाईलबंदीपेंचमध्ये जंगल सफारी दरम्यान जिप्सी चालक, पर्यटक व गाईड सर्वांकडे मोबाईल असतात. एका जिप्सी चालकाला वाघ किंवा बिबट दिसल्यास तो इतरांना मोबाईलवरून कॉल करून तेथे बोलावतो. त्यामुळे एकाच ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिनस्त असलेल्या व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य क्षेत्रात पर्यटक, गाईड व जिप्सी चालकांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ११ जानेवारी २०२५ पासून ही मोबाईल बंदी अंमलात येणार आहे. 'त्या' पर्यटकांना पेंचमध्ये बंदीउमरेड-पवनी-कहांडला अभयारण्यातील घटनेत ४ जिप्सीमध्ये असलेल्या २४ पर्यटकांना पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य क्षेत्रात आजीवन बंदी घालण्यात आली आहे. तसेच सफारी मार्गावर अशा घटना टाळण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीवnagpurनागपूर