शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची केली जातेय लुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST

- मुंबईसाठी १ लाख तर अमरावतीसाठी ३० हजार रुपयांची वसुली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपात्कालीन स्थितीत रुग्णांना वरदान ...

- मुंबईसाठी १ लाख तर अमरावतीसाठी ३० हजार रुपयांची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आपात्कालीन स्थितीत रुग्णांना वरदान ठरणाऱ्या रुग्णवाहिका कोरोना संक्रमणाच्या काळात रुग्णांचे आर्थिक कंबरडे मोडत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत किंवा अन्य तपासणीसाठी निश्चित केंद्रांपर्यंत नेण्यासाठी हजारो रुपये लाटले जात आहे. एवढेच नव्हे तर बेड किंवा हॉस्पिटल मिळत नसल्याच्या स्थितीत दुसऱ्या शहरात जाण्यासाठीही कैक पटीने भाडे आकारले जात असल्याचे चित्र आहे.

नागपुरात कोरोना संक्रमणाने उसळी घेतली आहे. दररोज सहा ते सात हजार संक्रमित रुग्ण वाढत आहेत. दररोज येणारे मृत्यूचे आकडेही घाबरवत आहेत. शासकीय असो वा खाजगी इस्पितळे रुग्णांनी भरून गेले आहेत. बेड उपलब्ध व्हावा म्हणून अत्यवस्थ रुग्णांची धावपळ सुरू आहे. अशा स्थितीत रुग्णांना हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलमधून विविध चाचणी केंद्रांवर जाण्यासाठी रुग्णवाहिका चालक मोठ्ठी रक्कम वसूल करत आहेत. साधारणत: दहा किमी अंतरापर्यंत ६०० ते ८०० रुपये भाडे आकारले जाते. मात्र, या काळात रुग्णांच्या अडचणीचा लाभ घेत दुप्पट भाडे आकारले जात आहेत. विशेष म्हणजे, रुग्णाला गरज असो वा नसो, ऑक्सिजन सिलेंडरचा दर त्यात जोडला जात आहे.

शहरात कोरोना संक्रमितांच्या दिवसेंदिवस वाढत्या संख्येने शहरातील हॉस्पिटल्स फुल्ल झाले आहेत. अशा स्थितीत रुग्ण अत्यवस्थ असल्यास व अन्य शहरात हॉस्पिटल उपलब्ध होत असल्याच्या स्थितीत अनेक रुग्ण अमरावतीकडे वळत आहेत. रुग्णाच्या स्थितीमुळे नातेवाईक रुग्णवाहिकेलाच पसंती देत आहेत. त्यासाठी २५ ते ३० हजार रुपये भाडे आकारले जात आहे. एका रुग्णाला मुंबईला नेण्यासाठी एका रुग्णवाहिका चालकाने एक लाखाच्या वर भाडे आकारल्याचेही सांगण्यात येत आहे. जिथे १० ते १२ हजार रुपये लागावे तिथे २५ ते ३० आणि तिथे २० ते २५ हजार रुपये लागावे तिथे एक लाख रुपयापर्यंत लुट रुग्णवाहिका चालकांकडून केली जात असल्याचे पुढे येत आहे.

--------------

रुग्णांना सरकारी रुग्णालयांची दाखवली जातेय भीती

मेयो, मेडिकल व अन्य शासकीय रुग्णालयांच्या बाहेर उभे असणारे खाजगी रुग्णवाहिका चालक रुग्णांना शासकीय रुग्णालयांची भीती दाखवत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या काळात शासकीय रुग्णालये आरोग्य सेवेबाबत कुठलीही कसूर ठेवत नसताना, या रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांना भीती दाखवून शासकीय रुग्णालयाची बदनामी केली जात असल्याचे आढळून येते. खाजगी हॉस्पिटल्सकडे रुग्णाला वळवून अतिरिक्त पैसा कमावण्याचाही हा प्रकार आहे. यात खाजगी हॉस्पिटल्सकडून रुग्णवाहिका चालकांना पैसा पुरविला जात असून रुग्णांकडूनही अतिरिक्त पैसा वसूलल्या जात असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त माहितीवरून स्पष्ट होत आहे.

------------------

मृतांच्या टाळूवरही खाल्ले जातेय लोणी

कोरोना संक्रमणाने मृत्यू झालेल्या रुग्णांना श्मशानघाटापर्यंत पोहोचविण्यासाठी खाजगी हाॅस्पिटल्सच्या रुग्णवाहिका नातेवाईकांकडून दोन ते तीन हजार रुपये वसूल करत आहेत. विशेष म्हणजे, हॉस्पिटल्सपासून स्मशानघाट फार लांब नाहीत. इतर आजाराच्या रुग्णांच्या प्रेतांना त्यांच्या गावापर्यंत नेण्यासाठीही खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहेत.

-----------------

शहरात रुग्णवाहिका (शासकीय, निमशासकीय, खाजगी हॉस्पिटल्स व अन्य)

* आरटीओ वेस्ट

सुदृढ स्थितीत - १८१

ढासळलेल्या स्थितीत - ११८

एकूण - २९९

* आरटीओ ईस्ट

सुदृढ स्थितीत - १३३

ढासळलेल्या स्थितीत - ५६

एकूण - १८९

----------------

जिल्ह्या आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व हॉस्पिटल्स येथील रुग्णवाहिका

ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट - ९

बेसिक लाईफ सपोर्ट - ३१

एकूण - ४०

..................