शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पारशिवनी-रामटेक मार्गावर ‘रास्ता रोको’

By admin | Updated: November 3, 2014 00:41 IST

ओलित करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नयाकुंड शिवारातील शेतातील रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळून आला. या शेतकऱ्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला,

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू : नयाकुंड शिवारातील घटना पारशिवनी : ओलित करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नयाकुंड शिवारातील शेतातील रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळून आला. या शेतकऱ्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला, असा आरोप करीत दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी पारशिवनी-रामटेक मार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. हेमराज पैकुजी निंंबोने (४२, रा. नयाकुंड, ता. पारशिवनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, तो पारशिवनी-आमडी फाटा मार्गावरील सूर्यअंबा स्पिनिंंग मिलमध्ये कामगार म्हणून काम करायचा. हेमराजची नयाकुंड शिवारात शेती असल्याने तो शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शेतात ओलित करण्यासाठी मोटरसायकलने गेला होता. त्याने मोटरसायकल याच शिवारातील सुनील निंंबोने यांच्या ढाब्याजवळ ठेवली आणि शेतात निघून गेल्याची माहिती सुनीलने दिली. सकाळीपर्यंत शेतातून परत न आल्याने सुनीलने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरीही चौकशी केली. हेमराज घरी न आल्याचे स्पष्ट होताच सुनील दुपारी १२ वाजताच्या सुमारास काही तरुणांसह शेतात गेला. त्यावेळी हेमराज हा शेतातील चिखलात पडला असल्याचे सुनीलला आढळून आले.हेमराजच्या शेतालगत सुधीर वेदप्रकाश अवस्थी यांचेसुद्धा शेत आहे. या शेतातील मोटारपंपासाठी घेतलेल्या अवैध वीजजोडणीच्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने हेमराजला जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज स्थानिक गावकऱ्यांनी वर्तविला. दरम्यान, हेमराजच्या मृत्यूची बातमी नयाकुंड येथे पोहोचताच नयाकुंड येथील चौकात अंदाजे २०० नागरिक गोळा झाले. काही वेळातच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रेटून धरत संतप्त नागरिकांनी पारशिवनी-रामटेक मार्गावर रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली. हेमराजच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांना त्वरित अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. नागरिकांनी मार्गावर टायर जाळल्याने या मार्गावरील वाहतूक किमान दोन तास खोळंबली होती.आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके, पारशिवनी पोलीस घटनास्थळी पोहोचले. दीपक साळुंके यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पारशिवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता रवाना केला. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)