पोह्याचे पैसे घेतल्याचा पोलिसांनी काढला वचपा

By Admin | Updated: July 14, 2016 03:08 IST2016-07-14T03:08:28+5:302016-07-14T03:08:28+5:30

पोह्याचे पैसे घेतले म्हणून पोलिसांनी त्याचा राग मनात ठेवून वचपा काढत नऊ हजार रुपये वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pacha's money was taken by the police | पोह्याचे पैसे घेतल्याचा पोलिसांनी काढला वचपा

पोह्याचे पैसे घेतल्याचा पोलिसांनी काढला वचपा

गपूर : पोह्याचे पैसे घेतले म्हणून पोलिसांनी त्याचा राग मनात ठेवून वचपा काढत नऊ हजार रुपये वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १५ दिवसांपूर्वीची आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रामदासपेठ परिसरातील एका हॉटेलमध्ये कार्यक्रम होता. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताला होते. बराच उशीर झाल्याने पोलिसांना भूक लागली. त्यांनी जवळच्या एका तरुणाच्या पोह्याच्या ठेल्यावर जाऊन पोहे खाल्ले व चहा घेतला. बिल झाले १०५ रुपये. मुलाने पोलिसांकडून बिल घेतले.
पोलिसांनी तेव्हा बिल दिले. मात्र रविवारी त्याचा वचपा काढला. पोलिसांनी मुलाला पकडून नेले. त्याचे काका घाबरले. ते ठाण्यात पोहोचले. पोलिसांचा पारा चढलेलाच होता. पोह्याचे पैसे घेतले म्हणून त्यांनी त्यांच्याकडून नऊ हजार रुपये वसूल केले. (प्रतिनिधी)

Web Title: Pacha's money was taken by the police