शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत पडणार ९० हजारावर नवीन मतदारांची भर

By admin | Updated: November 9, 2016 03:06 IST

नेत्यांचे भाग्य बदलण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या मतदार यादीत ९० हजारावर नवीन मतदारांचा समावेश होणार आहे.

निवडणूक : पूर्व नागपूर, कामठीतून सर्वाधिक अर्जनागपूर : नेत्यांचे भाग्य बदलण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या मतदार यादीत ९० हजारावर नवीन मतदारांचा समावेश होणार आहे. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पूर्व नागपूर व कामठी विधानसभा मतदार क्षेत्रातून सर्वाधिक अर्ज सादर करण्यात आले आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने हा खुलासा केला आहे.सुत्रांच्या माहितीनुसार, ‘वोटर लिस्ट समरी रिव्हिजन’च्या कालावधीमध्ये जिल्हा निवडणूक विभागाला ९० हजार ३१२ अर्ज क्र.-६ (नवीन मतदार), ५ हजार ४०३ अर्ज क्र.-८ (माहितीत सुधारणा) व १ हजार २५५ अर्ज क्र.-८-अ (स्थानांतरण) असे एकूण १ लाख ५ हजार ७८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय आकडेवारी पाहिल्यास, मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पूर्व नागपुरातून १४ हजार ३८, दक्षिण-पश्चिम नागपुरातून ७ हजार ४८, दक्षिण नागपुरातून ११ हजार ५००, मध्य नागपुरातून ३ हजार ८५३, पश्चिम नागपुरातून ५ हजार ८९०, उत्तर नागपुरातून ७ हजार ५४३, कामठीतून १५ हजार ८७६, रामटेकमधून ३ हजार ३३, काटोलमधून ३ हजार ९५८, सावनेरमधून ६ हजार ५०२, हिंगण्यातून ७ हजार ३७० तर, उमरेड येथून ३ हजार ५५९ अर्ज मिळाले आहेत. जिल्हा निवडणूक विभाग सर्व अर्जांची पडताळणी करेल. यानंतर पात्र नागरिकांचा अंतिम मतदार यादीत समावेश करण्यात येईल. नवीन मतदार यादी ५ जानेवारी २०१७ रोजी प्रकाशित होईल अशी माहिती मिळाली आहे.(प्रतिनिधी)आठ हजारावर मतदार वगळले जातीलमतदार यादीतून जुन्यापैकी ८ हजार ८१५ मतदारांना वगळले जाऊ शकते. यासाठी अर्ज क्र.-७ प्राप्त झाले आहेत. यापैकी बहुतांश मतदारांचा मृत्यू झाला असू शकतो. अर्जांची पडताळणी केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल.