शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

एसपी, डीसीपी बदली प्रक्रियेने रोषात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तब्बल चार महिने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उत्कंठा ताणून धरल्यानंतर सरकारने ...

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तब्बल चार महिने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उत्कंठा ताणून धरल्यानंतर सरकारने अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची पहिली यादी तीन दिवसांपूर्वी जाहीर केली. मात्र, या यादीत बदलीचे कोणते निकष सरकारने लावले ते संबंधितांना कळेनासे झाल्याने बदलीची ही यादी पोलीस अधिकाऱ्यांसाठी रोषाचा विषय ठरली आहे. त्यामुळे ‘बदली’नंतर आता ‘बदल’ करून घेण्यासाठी संबंधितांनी फिल्डिंग टाईट केली आहे.

गेल्या वर्षी अधिकाऱ्यांच्या बदलीपूर्व प्रक्रियेला लाखोंची लेण-देण, रेकॉर्डिंग आणि आरोप-प्रत्यारोपाची पार्श्वभूमी लाभली. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय राज्य सरकारसाठी विस्तवासारखा ठरला होता. त्यात अनेक वादग्रस्त अधिकाऱ्यांनी आपल्या गॉडफादर्सकडून फिल्डिंग टाईट केल्याने एसपी, डीसीपी आणि त्याउपरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नाव आणि स्थळांचा मेळच जमत नव्हता. त्यामुळे बदलीची यादी जाहीर करण्याऐवजी ‘तारीख पे तारीख’चा लपंडाव सुरू होता. परिणामी मे, जून, जुलै आणि ऑगस्ट अशा सलग चार महिन्यांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेले अधिकारी अक्षरश: वैतागले होते. दरम्यानच्या कालावधीत क्राईम पोस्ट समजल्या जाणाऱ्या ठिकाणांवर वर्णी लावून घेण्यासाठी अनेकांनी आपले घोडे दामटल्याने पुन्हा ‘पेटी, खोक्याची’ही चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर ३१ एसपी, डीसीपी आणि त्या पदाखालच्या अधिकाऱ्यांची यादी ९ सप्टेंबरला सरकारने जाहीर केली. मात्र, या यादीने अनेकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या रोषात आणखीच भर पडली आहे. काही नावे वगळता कोणत्या निकषाआधारे या बदल्या केल्या, तेच संबंधितांना कळेनासे झाले आहे. गणेशोत्सव बंदोबस्त आटोपल्यानंतर अर्थात १९ सप्टेंबरनंतर उर्वरित अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्याचे सांगून उफाळू पाहणारा रोष दाबण्याचे तंत्र अवलंबिण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

---

साईडलाईन ते साईडलाईन

सध्या जे अधिकारी साईडलाईन आहे, त्यांना एक्झ्युकेटिव्ह आणि जे एक्झ्युकेटिव्ह पोस्टवर आहेत त्यांना थोडी साईडलाईन पोस्ट दिली जाणार, अशी चर्चा होती. जे वादग्रस्त आहेत, त्यांना पुरतेच बाजूला ठेवून फ्रेशर्सना काम करण्याची चांगली संधी दिली जाईल, अशी अपेक्षा वजा चर्चा होती. मात्र, या बदलीच्या यादीतून तसे काहीही झळकलेले नाही. दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्यांची बदली, हा एकमात्र निकष लावण्यात आल्याचे या घडामोडीच्या संबंधाने सांगितले जात असले तरी त्यातही तथ्य नसल्याचे अनेक अधिकाऱ्यांच्या ‘हेल्डिंग’वरून दिसून येते. प्रचंड वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या काही अधिकाऱ्यांना क्राईम पोस्ट देऊन सरकारने चांगल्या अधिकाऱ्यांवर अन्याय केल्याचीही भावना आहे.

----

‘ते’ पुन्हा मागे पडणार ?

गेल्या वेळी २०१४-१५ च्या बॅचमधील काही अधिकाऱ्यांना एसपी म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. जागा कमी पडल्याने महाराष्ट्रातील ५ अधिकारी मागे पडले होते. या पाचमध्ये नागपुरातील निलोत्पल, लोहित मतानी आणि डॉ. अक्षय शिंदे यांचा समावेश होता. या पाच अधिकाऱ्यांना सर्वप्रथम पोलीस अधीक्षक म्हणून संधी मिळेल, असा दावा वजा विश्वास पोलीस दलातून व्यक्त होत होता. मात्र, निलोत्पल यांची डीसीपी मुंबई म्हणून बदली झाली आहे. नक्षल्यांच्या गुहेत शिरून काम करणाऱ्यांना कर्तव्यपूर्तीनंतरचा पुरस्कार म्हणून मनासारखी पोस्ट मिळते. मात्र, यावेळी तसे काहीच झालेले नाही.

---

१९ सप्टेंबरनंतर फुटणार पोळा

देशातील सुमारे ९५ अधिकारी सध्या हैदराबादला आयपीएस अकादमीत ट्रेनिंग घेत आहेत. त्यात महाराष्ट्रातील १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात बदली झालेल्यांपैकी अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासह चाैघांचा समावेश आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हे ट्रेनिंग कॅम्प पूर्ण होणार असून, तिकडून आल्यानंतर ते अधिकारी संबंधित ठिकाणी रुजू होणार आहेत. तत्पूर्वी गणपती बंदोबस्त १९ सप्टेंबरला संपेल आणि नंतर आक्रमकपणे हा विषय मार्गी लावला जाणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

----