शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

डासांचा प्रकोप वाढला; मनपा मात्र झोपेतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 01:07 IST

अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नागपूर शहरात डासांचा प्रकोप वाढला आहे. पूर्व,उत्तर, दक्षिण नागपूरसह सीमावर्ती भागातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. रिक्त भूखंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होण्याला वातावरण पोषक आहे. त्यात औषधाची फवारणी व फॉगिंग बंद असल्याने डासांचा प्रकोप वाढत आहे.

ठळक मुद्देफॉगिंगकडे दुर्लक्ष: औषधाचीही फवारणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नागपूर शहरात डासांचा प्रकोप वाढला आहे. पूर्व,उत्तर, दक्षिण नागपूरसह सीमावर्ती भागातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. रिक्त भूखंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होण्याला वातावरण पोषक आहे. त्यात औषधाची फवारणी व फॉगिंग बंद असल्याने डासांचा प्रकोप वाढत आहे.पूर्व नागपुरातील कळमना, विजयनगर, पारडी, भरतवाडा रोड, पुनापुर, गुलमोहर नगर, भांडेवाडी , वाठोडा,वर्धमान नगर,उत्तर नागपुरातील नारा- नारी, दीक्षित नगर, यशोधरा नगर, इंदोरा, जरीपटका आदी भागात डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दक्षिण नागपुरातील सीमावर्ती भागात अशीच परिस्थिती आहे. पश्चिम नागपूर,दक्षिण-पश्चिम नागपूर भागातही डासांचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असतानाही मनपा प्रशासनाने डासांना आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रभावी उपाययोजना हाती घेतलेली नाही.त्रस्त नागरिक नगरसेवक अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करतात परंतु कोविंड नियंत्रण कामात व्यस्त असल्याचे सांगितले जाते.स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रदीप पोहणे म्हणाले, प्रभाग २४ मध्ये मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. येथे पावसाचे पाणी जमा होते यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. नियंत्रणासाठी मनपा अधिकाºयांना फोन केला असता, ते ऐकायला तयार नाहीत. कोविडमध्ये ड्युटी असल्याचे सांगितले जाते. शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला तर याला मनपा प्रशासनास जबाबदार राहील. असेही पोहाणे म्हणाले.अधिकाऱ्यांना सूचना करूनही उपयोग नाहीझिंगाबाई टाकळी परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंदर्भात मनपा अधिकाºयांना सूचना केली. परंतु कुठल्याही स्वरूपाच्या उपाययोजना केलेल्या नाही, अशी माहिती माजी नगरसेवक अरुण डवरे यांनी दिली. आधीच नागरिक दहशतीत आहेत. त्यात डेंग्यू उद्भवला तर परिस्थिती बिकट होईल.नारा येथील रहिवासी संजय मेश्राम यांनी प्रभागाच्या नगरसेवकांना डासांचा प्रादुर्भाव विषयी माहिती दिली . परंतु नगरसेवकांची कुठलीही सूचना प्रशासनाकडून विचारात घेतली जात नाही अशी परिस्थिती आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका