शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आमचे व्हीजन ‘मल्टी डायमेंशनल ग्लोबल सिटीझन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

नागपूर : मेघे ग्रुप ऑफ स्कूल ने १९८७ मध्ये एका शाळेपासून सुरूवात केली होती. आज या शाळेच्या १३ शाखा ...

नागपूर : मेघे ग्रुप ऑफ स्कूल ने १९८७ मध्ये एका शाळेपासून सुरूवात केली होती. आज या शाळेच्या १३ शाखा विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये आहे. मुलांच्या सर्वांगिन विकास भर देणाऱ्या मेघे ग्रुफ ऑफ स्कूलच्या स्कूल ऑफ स्कॉलर्सने ‘मल्टी डायमेंशनल ग्लोबल सिटीझन’ निर्माण करण्याचे व्हीजन ठेवले आहे. हे व्हीजन डोळ्यापुढे ठेवून ३० वर्षाहून अधिकच्या प्रवासातही विद्यार्थी घडविण्यात संस्था व्रतस्थ आहे.

विदर्भातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे. या उद्देशातून मेघे ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक दत्ताजी मेघे यांनी शाळेची स्थापना केली. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेबरोबरच सीबीएससी शाळा त्यांनी सुरू केल्या. विदर्भातील स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या १३ ही शाखांमध्ये २० हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. जवळपास १ हजारावर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या जडणघडणीत कार्यरत आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्स सुुरुवातीपासून बहुआयामी व्यक्तिमत्व घडविण्यास प्रयासरत आहे. केवळ अभ्यासावरच लक्ष केंद्रीय न करता मुलांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमाची जोड संस्थेने दिली आहे. या शाळेत गणित, विज्ञानासारखे विषय जेवढ्या गंभिरतेने शिकविल्या जाते, तेवढ्या गंभीरतेने म्युझिक, आर्ट, ड्रॉईंग आणि खेळातही मुलांची रुची वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. खेळामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ येथील शाखांमधील जास्तीतजास्त विद्यार्थी नॅशनल खेळले आहे. ऑलिम्पिकच्या ट्रायलमध्ये ते सहभागी झाले आहे. सन्मानजनक अवाॅर्ड त्यांनी मिळविले आहे. हे केवळ मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित केल्यामुळे संस्थेलाही मान मिळाला आहे. दत्ताजी मेघे यांचे स्वप्न, सागर मेघे, समीर मेघे, देविका मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करीत असल्याचे संस्थेच्या संचालिका आभा मेघे यांनी सांगितले.

- गिनीज आणि लिमका बुकमध्ये नोंद

गुणवत्तेबरोबरच खेळातही नामांकन मिळविलेल्या स्कूल ऑफ स्कॉलरच्या विद्यार्थ्यांनी गिनीज आणि लिम्का बुकमध्ये नोंद केली आहे. स्कूलच्या १ हजार मुलांच्या ऑर्केस्टाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने केली आहे. तर अमरावती शाखेच्या १२०० हुन अधिक विद्यार्थिनींनी एकाच मंचावर केलेल्या कथ्थक नृत्याची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. मुलांना पारितोषिक मिळणे किंवा रेकॉर्डमध्ये नाव होणे हा आमचा उद्देश नाही, तर मुलांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा आमचा मानस आहे.

- जागतिक नागरीक घडविण्याचा प्रयत्न

मल्टी डायमेंशनल ग्लोबल सिटीजन आमचे व्हीजन आहे. आम्हाला आपल्या मुलांना संपूर्ण जगासाठी तयार करायचे आहे. त्यामुळे इंट्रॅक्शन किंवा कोलॅब्रेटीव्ह लर्निंगवर आमचा भर आहे. इंग्लंड, नेदरलॅण्डच्या शाळेसोबत आमची कोलॅब्रेटीव्ह लर्निंग सुरू आहे. त्यांच्यासोबत आमचे विद्यार्थी वेगवेगळे प्रोजेक्ट करतात. या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सृदृढ, सुसंस्कृत आणि सुशिक्षित जागतिक दर्जाचा नागरीक घडविण्याचा प्रयत्न करतो.

- अमेरिकन कंपनीने आम्हाला दिलेय क्यू. एस. लीड सर्टिफिकेशन

कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला. पण स्कूल ऑफ स्कॉलर्सने सुरवातीपासूनच अ‍ॅडव्हान्स एज्युकेशन भर दिला होता. आम्ही लॉकडाऊन लागताच व्हर्च्युअल टीचिंग सुरू केली. डिजिटल क्लासरुम तयार केले. विद्यार्थ्यांना अ‍ॅक्टीव्हीटी, वर्कशीट, रेकॉर्डींग लेसन देण्यात आले. शिक्षकांना प्रशिक्षण दिले. त्यांना लॅपटॉप व त्यांच्या घरी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांचे वर्कशॉप झाले. पालकांचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे फिजिकल क्लास ते ऑनलाईन क्लासमध्ये अगदी सहज आम्ही परिवर्तन केले. पालकांनी आणि विद्यार्थ्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचाच परिणाम म्हणून बेस्ट ऑनलाईन टीचिंगचे अमेरीकन कंपनीचे क्यु.एस. लीड सर्टीफिकेट मेघे ग्रुप ऑफ स्कूलला मिळाले. सरकारचे शिक्षणाचे सर्व नियम आम्ही पाळत असून, आमच्या सर्व ऑनलाईन अ‍ॅक्टीव्हीटी सुरू आहे.

आभा मेघे, संचालिका मेघे ग्रुप ऑफ स्कूल