शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या देशालाही ‘बाबासाहेब’ हवे होते

By admin | Updated: October 3, 2014 02:53 IST

बुद्धाचा धम्म आमच्या व्यवहारातच नव्हे तर आचारणात सुद्धा आहे. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष भारताला लाभले.

नागपूर : बुद्धाचा धम्म आमच्या व्यवहारातच नव्हे तर आचारणात सुद्धा आहे. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष भारताला लाभले. त्यामुळे भारताबद्दल आम्हाला विशेष आदर आहे. आम्हाला बाबासाहेबांसारखी व्यक्ती लाभली नाही, ही खंत आहे. कदाचित आम्हालासुद्धा बाबासाहेबांसारखी व्यक्ती मिळाली असती तर, असा प्रश्न थायलंडमधील एका ज्येष्ठ महिला पत्रकाराने उपस्थित केला. डॉ. रुंगथिप चोटनापलाई असे या पत्रकार महिलेचे नाव आहे. डॉ. रुंगथिप या थाई टीव्ही चॅनलच्या पत्रकार असून न्यूज अ‍ँकर सुद्धा आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना विशेष आवड आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी संशोधन केले असून त्यांची डॉक्युमेंट्री सुद्धा तयार केली आहे. थायलंडमधील जनतेमध्ये त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचे कार्य करतात. दीक्षाभूमीवर आलेल्या ३८ प्रतिनिधींसोबत त्या सुद्धा आल्या आहेत. यावेळी डॉ. एस.के. गजभिये यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. थायलंड हे ९० टक्के बुद्धीस्ट राष्ट्र आहे. बुद्ध आमच्या देशात झाले नाही, तरीही आमच्या राष्ट्राने बुद्ध धम्म स्वीकारला. आज आमच्या आचारणात धम्म आहे. तथागत गौतम बुद्ध हे भारतात होऊन गेल्याने भारताबद्दलचा आदर हा नेहमीच राहिला आहे. परंतु भारत म्हणजे केवळ बुद्धगया आणि आजूबाजूचा परिसर इतकेच आजवर आम्हाला माहिती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आम्ही जसजसे ऐकले. त्यांच्याबाबत अधिकाधिक माहिती मिळविली तेव्हा आम्हाला धक्काच बसला. जो धम्म या देशातून हद्दपार झाला होता, तो त्यांनी पुनर्जीवित केला. बुद्धगयेच्या बाहेरही बुद्ध धम्म आहे, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आज नागपुरात आल्यावर भारतात बुद्ध धम्माची पाळेमुळे किती खोलवर रुजली याचा प्रत्यय आला. यांचे संपूर्ण श्रेय बाबासाहेबांनाच जाते. त्यांचे त्रिवार धन्यवाद. डॉ. गजभिये यांनी अनुवाद केला. (प्रतिनिधी)