शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अतिरेक्यांना हजर ठेवण्याचे आदेश

By admin | Updated: February 6, 2015 00:54 IST

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-सैलानी येथील दहशतवादी कृत्य प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींवर २१ फेब्रुवारी रोजी दोषारोप निश्चित होणार असून या सर्व आरोपींना न्यायालयात

दोषारोप निश्चित होणार: चिखली-सैलानी दहशतवादी कृत्य प्रकरणनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-सैलानी येथील दहशतवादी कृत्य प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींवर २१ फेब्रुवारी रोजी दोषारोप निश्चित होणार असून या सर्व आरोपींना न्यायालयात हजर ठेवण्याचे आदेश गुरुवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने नागपूर दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाला दिले. सीमी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा सक्रिय कार्यकर्ता जहाल दहशतवादी शाकीर ऊर्फ खलील अकिल खिलजी, अकिल युसुफ खिलजी (४५), जफर हुसैन कुरेशी (३२), मोहम्मद अबरार खान ऊर्फ मुन्ना, अन्वर इब्राहम हुसैन खत्री , अशी या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी अन्वर हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असून बाकीचे आरोपी वेगवेगळ्या कारागृहात आहेत. आरोपपत्रात एकूण आठ जणांचा समावेश असून त्यापैकी एक चकमकीत ठार झालेला आहे तर दोघे फरार आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली आणि सैलानी येथे शिबिरे चालवून दहशतवादी कारवाया केल्या प्रकरणी अकोला एटीएसचे पोलीस निरीक्षक केशव श्यामराव पातोंड यांच्या फिर्यादीवरून २७ मार्च २०१२ रोजी भादंविच्या कलम १५३ अ, १२० ब, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलम १०, १३, १५, १६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दहशतवाद्यांपैकी २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबाद येथे खलील खिलजी याने पोलीस पथकावर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरात पोलीस पथकानेही दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. परिणामी खलीलच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला होता. आणखी एक दहशतवादी अजहर कुरेशी ऊर्फ वकील कुरेशी हा चकमकीत ठार झाला होता. एटीएसने मोहम्मद अबरार, अन्वर हुसैन आणि खलील खिलजी यांना अटक केली होती. त्यानंतर सैलानी आणि चिखली येथे सापळा रचून अकिल खिलजी आणि जफर कुरेशी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मुस्लीम तरुणांना चिथावणारे आक्षेपार्ह साहित्य, रिव्हॉल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. हा खटला चालविण्यासाठी सरकारने पी. के. सत्यनाथन यांना विशेष सरकारी वकील नेमले आहे. (प्रतिनिधी)