शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएनआयटी समितीच्या अहवालावर आक्षेप

By admin | Updated: January 8, 2015 01:20 IST

मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना सुचविणाऱ्या व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) समितीच्या अहवालावर आक्षेप घेण्यात आला आहे.

हायकोर्ट : मेहंदीबाग रेल्वेगेट वाहतूक कोंडीचे प्रकरणनागपूर : मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना सुचविणाऱ्या व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) समितीच्या अहवालावर आक्षेप घेण्यात आला आहे. खैरीपुरा-बिनाकी-मंगळवारी-प्रेमनगर निवासी कृती समितीचे अध्यक्ष सचिन बिसेन यांची यासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. शासनाने मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी व्हीएनआयटी अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीने अहवाल देऊन वाहतूक सुरळीत होण्यासाठी मेहंदीबाग येथे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे अंडरब्रिजला समांतर दुसरा रेल्वे अंडरब्रिज बांधण्याची सूचना केली आहे. याचिकाकर्त्यांनी याचा विरोध केला आहे. सध्याच्या रेल्वे अंडरब्रिजमध्ये पाऊस आल्यानंतर पाणी साचते. यानंतर येथून तासंतास अवागमन करता येत नाही. अशा परिस्थितीत दुसरा रेल्वे अंडरब्रिज किती उपयोगी ठरेल, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उपस्थित केला. तसेच, समितीने समस्येचा अभ्यास करताना इंडियन रोड काँग्रेस व इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट आॅफ सिव्हिल इंजिनिअरिंग यांच्या मार्गदर्शकतत्वांचा विचार केला नसल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड़ अनिल किलोर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)अहवालाचा पुनर्विचार कराइंडियन रोड काँग्रेस व इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट आॅफ सिव्हिल इंजिनिअरिंग यांची मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन अहवालाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेतल्यानंतर अहवालात बदल करायचा की, जुनाच अहवाल कायम ठेवायचा याचा निर्णय घेऊन तीन आठवड्यांत माहिती सादर करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.