शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ५८ दिवसांत सोयाबीनची केवळ ५.७४ लाख टन खरेदी; खरेदीचा वेग मुद्दाम संथ ?

By सुनील चरपे | Updated: January 13, 2026 13:09 IST

Nagpur : नाफेड, एनसीसीएफच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह; दोन्ही संस्थांना उद्दिष्टपूर्तीसाठी ३२ दिवस, १३.२६ लाख टन सोयाबीन शिल्लक, प्रक्रियेत क्लिष्टता, खरेदी संथ

सुनील चरपे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारने राज्यात एमएसपी दराने १९ लाख टन सोयाबीन खरेदीची घोषणा केली होती. नाफेड व एनसीसीएफ या दोन्ही संस्थांना ९० दिवसांत ही खरेदी पूर्ण करायची आहे. या दोन्ही संस्थांनी राज्यात ५८ दिवसांत ५,७४,१३३.३७७९ टन सोयाबीनची खरेदी केली असून, त्यांना उद्दिष्टपूर्तीसाठी उर्वरित ३२ दिवसांत १३,२५,८६६.६२२१ टन सोयाबीनची खरेदी करायची आहे. शेतकऱ्यांकडील सोयाबीनची उपलब्धता व खुल्या बाजारातील एमएसपीच्या आसपास आलेले दर विचारात घेता दोन्ही संस्थांच्या कार्यप्रणाली व सरकारच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांकडील सोयाबीन ऑक्टोबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात यायला सुरुवात झाली आणि राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून १५ नोव्हेंबर २०२५ पासून एमएसपी दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले. नोंदणी प्रक्रियेतील क्लिष्टता, खरेदीचा संथ वेग या व इतर तांत्रिक बाबी निर्माण करून सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्याकडील सोयाबीन एमएसपीपेक्षा कमी दराने खुल्या बाजारात विकायला भाग पाडले. दोन्ही संस्थांनी १५ नोव्हेंबरपासून आजवर सोयाबीन खरेदीचा वेग वाढविला नाही. या संपूर्ण प्रकारात सरकारने सोयाबीन उत्पादकांच्या पदरात एमएसपीऐवजी आर्थिक नुकसान टाकले आहे.

७३,९४१ शेतकरी व १३.२६ लाख टन सोयाबीन

पीकविम्याच्या आकडेवारीनुसार राज्यात जवळपास ५० लाख सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. यातील केवळ ६,१७,२३० सोयाबीन उत्पादकांनी नाफेड व एनसीसीएफकडे सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली होती. या दोन्ही संस्थांनी ११ जानेवारीपर्यंत ५,४३,२८९ शेतकऱ्यांकडून ५,७४,१३३.३७७९ टन सोयाबीन खरेदी केले. उर्वरित ७३,९४१ शेतकऱ्यांकडे १३,२५,८६६.६२२१ टन सोयाबीन असेल काय ?

खरेदीचा वेग मुद्दाम संथ

नाफेडने ९१० खरेदी केंद्रांना मंजुरी देत ७९३ केंद्रे सुरू करून ५,४६,३४३ शेतकऱ्यांची नोंदणी करीत ४,७७,१० शेतकऱ्यांकडून ५१,३४,३५०.८३० क्विंटल सोयाबीन खरेदी केले. एनसीसीएफने १५८ केंद्रांना मंजुरी देत १३९ केंद्रे सुरू करीत ७०,८८७ नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी ६६,१८२ शेतकऱ्यांकडून ६,०६,९८२.९४९ क्विंटल सोयाबीन खरेदी केले. या आकड्यांवरून खरेदीचा वेग मुद्दाम संथ ठेवल्याचे स्पष्ट होते.

सोयाबीन खरेदीचे विवरण (१५ नोव्हें. २०२५ ते ११ जाने. २०२६)संस्था                                 खरेदी केंद्र               नोंदणीकृत शेतकरी          सोयाबीन खरेदी (टन)नाफेड                             ७९३ (९१० मंजूर)               ५,४६,३४३                  ५,१३,४३५.०८३एनसीसीएफ                     १३९ (१५८ मंजूर)                 ७०,८८७                    ६०,६९८.२९४९

 

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Procurement Slow in Maharashtra; Is the Pace Deliberately Sluggish?

Web Summary : Maharashtra's soybean procurement lags, raising concerns about deliberate delays. Despite MSP declarations, agencies purchased only a fraction of the target in 58 days. Complex registration and slow purchasing force farmers to sell at lower market rates, causing financial losses.
टॅग्स :SoybeanसोयाबीनCropपीकFarmerशेतकरीfarmingशेतीnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र