शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक चार पदरी सिमेंट रोड मंजूर

By admin | Updated: June 2, 2015 02:19 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या विकासाचा झपाटा लावला आहे. दोन महिन्यांपूर्वी विदर्भातील रस्ते व पुलांसाठी

कमलेश वानखेडे नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या विकासाचा झपाटा लावला आहे. दोन महिन्यांपूर्वी विदर्भातील रस्ते व पुलांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केल्यानंतर आता झिंगाबाई टाकळी- गोधनी ते छिंदवाडा रोडपर्यंत चारपदरी सिमेंट रोड करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.राज्य सरकारचा सीआर फंड केंद्र सरकारकडे राखीव असतो. या निधीतून संबंधित रस्त्याचे काम होणार आहे. ५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १७ कोटी रुपये देणे निश्चित झाले आहे. संबंधित रस्ता बांधण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचआय) सोपविण्यात आली असून यासाठी डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) तयार करण्यासही सुरुवात झाली आहे. यानंतर लवकरच निविदा काढून कार्यादेश दिले जातील. ही सर्व प्रक्रिया सहा महिन्यांत आटोपून कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. झिंगाबाई टाकळी ते गोधनी या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात नवीन ले-आऊट व वसाहती उभारण्यात आल्या आहेत. या भागातील रहिवासी घनतेत बरीच वाढ झाली आहे. छिंदवाडा रोडला समांतर जाणारा व पुढे छिंदवाडा रोडला जोडणारा दुसरा रस्ता नाही. त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय महामार्गावरील भार कमी करण्यासाठी हा मार्ग उपयोगी ठरू शकतो. त्यामुळेच चारपदरी सिमेंट रस्त्यासाठी या रस्त्याची निवड करण्यात आली आहे. संबंधित रस्ता या परिसराचे सामाजिक- आर्थिक चित्र पालटण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.वाढती लोकसंख्या व वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी झिंगाबाई टाकळी ते गोधनी ते छिंदवाडा रोड पर्यत चारपदरी सिमेंट रोड होणे आवश्यक होते. आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संबंधित रस्त्याचा विकास करण्याची विनंती केली व त्यांनी ती मान्य केली. आता लवकरच या संबंधीची प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल. - आ. सुधाकर देशमुख, पश्चिम नागपूर