आणखी एक चार पदरी सिमेंट रोड मंजूर

By Admin | Updated: June 2, 2015 02:19 IST2015-06-02T02:19:18+5:302015-06-02T02:19:18+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या विकासाचा झपाटा लावला आहे. दोन महिन्यांपूर्वी विदर्भातील रस्ते व पुलांसाठी

One more four-kilometer cement road approved | आणखी एक चार पदरी सिमेंट रोड मंजूर

आणखी एक चार पदरी सिमेंट रोड मंजूर

कमलेश वानखेडे नागपूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या विकासाचा झपाटा लावला आहे. दोन महिन्यांपूर्वी विदर्भातील रस्ते व पुलांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केल्यानंतर आता झिंगाबाई टाकळी- गोधनी ते छिंदवाडा रोडपर्यंत चारपदरी सिमेंट रोड करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.
राज्य सरकारचा सीआर फंड केंद्र सरकारकडे राखीव असतो. या निधीतून संबंधित रस्त्याचे काम होणार आहे. ५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १७ कोटी रुपये देणे निश्चित झाले आहे. संबंधित रस्ता बांधण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचआय) सोपविण्यात आली असून यासाठी डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) तयार करण्यासही सुरुवात झाली आहे. यानंतर लवकरच निविदा काढून कार्यादेश दिले जातील. ही सर्व प्रक्रिया सहा महिन्यांत आटोपून कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
झिंगाबाई टाकळी ते गोधनी या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात नवीन ले-आऊट व वसाहती उभारण्यात आल्या आहेत. या भागातील रहिवासी घनतेत बरीच वाढ झाली आहे. छिंदवाडा रोडला समांतर जाणारा व पुढे छिंदवाडा रोडला जोडणारा दुसरा रस्ता नाही. त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय महामार्गावरील भार कमी करण्यासाठी हा मार्ग उपयोगी ठरू शकतो. त्यामुळेच चारपदरी सिमेंट रस्त्यासाठी या रस्त्याची निवड करण्यात आली आहे. संबंधित रस्ता या परिसराचे सामाजिक- आर्थिक चित्र पालटण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

वाढती लोकसंख्या व वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी झिंगाबाई टाकळी ते गोधनी ते छिंदवाडा रोड पर्यत चारपदरी सिमेंट रोड होणे आवश्यक होते. आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संबंधित रस्त्याचा विकास करण्याची विनंती केली व त्यांनी ती मान्य केली. आता लवकरच या संबंधीची प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल.
- आ. सुधाकर देशमुख, पश्चिम नागपूर

Web Title: One more four-kilometer cement road approved