वि.सा.संघातर्फे मुख्यमंत्री निधीसाठी एक लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:08 IST2021-04-22T04:08:10+5:302021-04-22T04:08:10+5:30

नागपूर : सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गात शासनाला उपाययोजनांसाठी मदत म्हणून विदर्भ साहित्य संघाने एक लाख एक ...

One lakh for CM fund from VSA | वि.सा.संघातर्फे मुख्यमंत्री निधीसाठी एक लाख

वि.सा.संघातर्फे मुख्यमंत्री निधीसाठी एक लाख

नागपूर : सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गात शासनाला उपाययोजनांसाठी मदत म्हणून विदर्भ साहित्य संघाने एक लाख एक हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे मुख्यमंत्री कोविड-१९ सहाय्यता निधीसाठी प्रशासनाकडे सुपूर्द केली.

विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे आणि सरचिटणीस विलास मानेकर यांनी एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्याकडे बुधवारी सुपूर्द केला. विदर्भ साहित्य संघ मागील शंभर वर्षापासून वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीत सामाजिक भान जागते ठेवून ही देणगी मुख्यमंत्री निधीसाठी सुपूर्द

केली असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी शासन सर्वस्तरांवर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या बिकट परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनीही सरकारच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा विदर्भ साहित्य संघाने व्यक्त केली आहे.

Web Title: One lakh for CM fund from VSA