वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST2021-09-12T04:12:21+5:302021-09-12T04:12:21+5:30

पाटणसावंगी : भरधाव अज्ञात वाहनाने ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. त्यात ॲक्टिव्हा चालक तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर ...

One killed, one injured in vehicle collision | वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी

वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी

पाटणसावंगी : भरधाव अज्ञात वाहनाने ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. त्यात ॲक्टिव्हा चालक तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर मार्गावरील पाटणसावंगी (ता. सावनेर) येथील उड्डाणपुलावर गुरुवारी (दि. ९) मध्यरात्री १.४५ वाजताच्या सुमारास घडली.

रवींद्र चंद्रभान भागवतकर (३५, रा. रमाईनगर, काेराडी, ता. कामठी) असे मृताचे नाव असून, श्याम भाेवते असे जखमीचे नाव आहे. दाेघेही मित्र असून, ते एमएच-४०/बीएन- ४०५२ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने काेराडीहून सावनेरला जात हाेते. दरम्यान, पाटणसावंगी येथील उड्डाणपुलावर वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. यात दाेघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाटणसावंगी पाेलीस चाैकीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले आणि दाेघांनाही उपचारासाठी नागपूरला हलविले. तिथे डाॅक्टरांनी रवींद्र भागवतकर याला मृत घाेषित केले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर करीत आहेत.

Web Title: One killed, one injured in vehicle collision