एक शाम लोकमत समाचार के नाम

By Admin | Updated: January 12, 2016 03:15 IST2016-01-12T03:15:59+5:302016-01-12T03:15:59+5:30

शहरातील सर्वाधिक प्रसाराचे हिंदी वर्तमानपत्र ‘लोकमत समाचार’ १४ जानेवारी रोजी आपला २७ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे.

One evening Lokmat News's name | एक शाम लोकमत समाचार के नाम

एक शाम लोकमत समाचार के नाम

२७ वा वर्धापनदिन सोहळा : १४ ला भव्य काव्यसंध्या
नागपूर : शहरातील सर्वाधिक प्रसाराचे हिंदी वर्तमानपत्र ‘लोकमत समाचार’ १४ जानेवारी रोजी आपला २७ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. यानिमित्त लोकमत समाचारने आपल्या वाचकांसाठी १४ जानेवारी रोजी ‘एक शाम लोकमत समाचार के नाम...! या नावाने भव्य काव्यसंध्या आयोजित केली आहे.
सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या काव्यसंध्येत देशातील प्रसिद्ध कवी व शायर सहभागी होतील. यात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम व प्रसिद्ध कवी शैलेष लोढा आणि आपल्या शायरीसाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेले शायर मुनव्वर राणा आपल्या रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध करतील. यासोबतच सुप्रसिद्ध गीतकार विष्णू सक्सेना, उज्जैनचे कवी दिनेश दिग्गज, जयपूरचे हास्य कवी संजय झाला आणि भोपाळचे मंजर भोपाली सुद्धा आपल्या कविता सादर करतील. (प्रतिनिधी)

Web Title: One evening Lokmat News's name