ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:09 IST2021-01-23T04:09:24+5:302021-01-23T04:09:24+5:30

देवलापार : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली आणि दुचाकीवरील तिघेही राेडवर फेकले गेले. त्यातील एकाच्या अंगावरून ...

One died after falling under the wheel of a tractor | ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने एकाचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने एकाचा मृत्यू

देवलापार : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल स्लीप झाली आणि दुचाकीवरील तिघेही राेडवर फेकले गेले. त्यातील एकाच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या ट्राॅलीचे चाक गेल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना देवलापार पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माैदी-पवनी मार्गावर घडली.

राजेंद्र हरी इवनाते (रा. माैदा) असे मृताचे नाव आहे. ताे राजेश जयवंत पवार (३५, रा. माैदी) याच्यासाेबत एमएच-४०/सीबी-९५४१ क्रमांकाच्या माेटरसायकलवर मागे बसून जात हाेता. त्या माेटरसायकलवर या दाेघांसाेबत आणखी एक जण हाेता. दरम्यान, राजेशचा माेटरसायकलवरील ताबा सुटल्याने तिघेही राेडवर फेकले गेले. त्यातच वेगात आलेल्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीचे चाक राजेंद्रच्या अंगावरून गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांनाही देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर दाेघांना सुटी देण्यात आली, तर राजेंद्रला नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी राजेश पवार विरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ), ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास ठाणेदार प्रवीण बाेरकुटे करीत आहेत.

Web Title: One died after falling under the wheel of a tractor