विषारी औषध प्राशन करून एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:02+5:302021-04-13T04:08:02+5:30

पारशिवनी : फवारणीचे विषारी औषध प्राशन करून एकाने आत्महत्या केल्याची घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हादेवी शिवारात नुकतीच घडली. ...

One commits suicide by consuming poisonous drug | विषारी औषध प्राशन करून एकाची आत्महत्या

विषारी औषध प्राशन करून एकाची आत्महत्या

पारशिवनी : फवारणीचे विषारी औषध प्राशन करून एकाने आत्महत्या केल्याची घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हादेवी शिवारात नुकतीच घडली.

पाेवर देवानंद गायकवाड (६५, रा. कान्हादेवी, ता. पारशिवनी), असे मृताचे नाव आहे. त्यांची कान्हादेवी शिवारात शेती असून, ते शेतात कामानिमित्त गेले हाेते. शेतात कुणीही नसताना त्यांनी फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना लगेच पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस नायक राेशन काळे करीत आहेत.

Web Title: One commits suicide by consuming poisonous drug