शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एका नवरोबाने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - एमआयडीसीत पतीने नवविवाहित पत्नीची हत्या केल्याच्या घटनेच्या वृत्ताची शाई सुकायची असतानाच पारडीतही सोमवारी मध्यरात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - एमआयडीसीत पतीने नवविवाहित पत्नीची हत्या केल्याच्या घटनेच्या वृत्ताची शाई सुकायची असतानाच पारडीतही सोमवारी मध्यरात्री पुन्हा एक असेच भीषण हत्याकांड घडले. संशयाचे भूत डोक्यावर बसल्याने एका नवरोबाने त्याच्या नवविवाहित पत्नीची अमानूषपणे हत्या केली. ज्योती ललित मार्कंडे (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे, तर तिची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव ललित समयलाल मार्कंडे (वय २५) आहे. आरोपी ललित मूळचा राजनांदगाव (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. तो तीन वर्षांपूर्वी नागपुरात रोजगाराच्या शोधात आला. सध्या तो मॉ उमिया सोसायटीच्या एमआयडीसीत राहतो. तेथे तो एका आरामशीनवर काम करतो. त्याचा चुलत जावई आणि बहीणही तेथेच काम करतात आणि बाजूच्या झोपड्यात राहतात. ज्योती वाठोड्यातील भांडेवाडीजवळ राहायची. तीन महिन्यांपूर्वी तिचे ललितसोबत लग्न झाले. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर हे दोघे एकमेकांवर संशय घेऊन भांडू लागले. रात्री उशिरापर्यंत दोघेही मोबाईलमध्ये व्यस्त राहत होते आणि एकमेकांना टोमणे मारत होते. त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी समजही दिली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री ११ च्या सुमारास नेहमीप्रमाणे ललित, ज्योती तसेच त्याची चुलत बहीण आणि जावई एकत्र जेवले. त्यानंतर ते बाजूच्या झोपड्यात झोपायला गेले. सकाळी ८ वाजले तरी दोघांपैकी कुणीच घराबाहेर न आल्याने ललितची चुलत बहीण आणि जावयाने त्यांना आवाज दिला. प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते झोपड्यात गेले असता ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसली. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नंतर पारडी पोलिसांना कळविले. ठाणेदार सुनील गांगुर्डे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांनीही धाव घेतली.

---

लाकडी दांडक्याने डोक्यात फटके

आरोपी ललितने त्याच्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने फटके हाणून तिची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी काढला. बाजूलाच रक्ताने माखलेले दांडकेही पोलिसांनी जप्त केले. हत्या केल्यानंतर आरोपी ललित जबलपूर हायवेलगतच्या बहादुरा गावाकडे पळून गेला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढून दुपारी ३ च्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.

---

म्हणून केली हत्या

पत्नी रात्रंदिवस दुसऱ्यासोबत मोबाईलवर संपर्कात राहायची. तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने तिला विचारणा केल्यानंतर ती मुजोरी करायची. म्हणून तिची हत्या केल्याचे आरोपीने प्राथमिक चाैकशीत पोलिसांना सांगितले आहे.

---