शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

आधी जुनी देणी, नंतर नवीन कामांना संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

पदाधिकाऱ्यांची चिंता कायम : स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला मनपा प्रशासनाची मंजुरी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष ...

पदाधिकाऱ्यांची चिंता कायम : स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला मनपा प्रशासनाची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी २०२१-२२ या वर्षाचा २७९६.०७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. २२ दिवसांनंतर मनपाच्या वित्त विभागाने या अर्थसंकल्पाला सशर्त मंजुरी दिली आहे. यात जुनी देणी दिल्यानंतर उपलब्ध निधी विचारात घेऊन नवीन कामांसाठी निधी उपलब्ध करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षात होणारी मनपा निवडणूक व वित्त विभागाने घातलेल्या अटी व शर्ती विचारात घेता, पदाधिकाऱ्यांना नवीन काम मंजूर करताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला महासभेने सुधारणांसह मंजुरी दिली आहे. मात्र त्यातील मंजूर तरतुदीअंतर्गत खर्चाचे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी सर्व विभाग प्रमुखांनी वित्त विभागाकडून चालू आर्थिक वर्षातील प्रस्तावित व प्रत्यक्ष उत्पन्न याची माहिती घेऊन नवीन प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. यामुळे नवीन प्रस्तावांना मंजुरी घेताना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना संबंधित पदात निधी शिल्लक आहे की नाही, याचा अभ्यास करावा लागणार आहे. याचा विचार करता, प्रभागातील कामे करताना नगरसेवकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात नगरसेवकांना २० लाखाचा निधी देतानाच रस्ते, नाल्या दुरुस्ती व विकास कामासाठी ३०० कोटीहून अधिक तरतूद केली आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी प्रभागातील रखडलेली विकास कामे होतील, अशी आशा नगरसेवकांना होती. मात्र वित्त विभागाच्या शर्ती व अटींमुळे नगरसेवकांची चिंता वाढली आहे.

.......

विभाग प्रमुख व वित्त अधिकाऱ्यांचे पत्र लागणार

नवीन कामांची फाईल सादर करताना विभाग प्रमुख व प्रमुख लेखा व वित्त अधिकारी यांचे कव्हरिंग पत्र लागणार आहे. संबंधित विभागात प्रस्तावित कामांसाठी निधी उपलब्ध असला, तरच विभाग प्रमुख व प्रमुख लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे पत्र मिळणार आहे. यामुळे नगरसेवकांना निधी उपलब्ध असल्याची खातरजमा करूनच फाईल सादर करावी लागणार आहे.

....

२०३ कोटींचे अनुदान मिळाले नाही

स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ३२० कोटींची आधीची शिल्लक दर्शविण्यात आली आहे. मात्र यातील अपेक्षित २०३ कोटीचे अनुदान मिळाले नाही. याचा परिणाम विकास कामांवर होणार आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे कोविड संक्रमणाचा मनपाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने याचा फटका विकास कामांना बसण्याची शक्यता आहे.