शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची ‘फ्री स्टाईल’

By admin | Updated: February 14, 2016 02:48 IST

शेतकऱ्यांसाठी कृषी योजना राबविणाऱ्या कृषी विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’ झाल्याची घटना पुढे आली आहे.

जीवन रामावत नागपूरशेतकऱ्यांसाठी कृषी योजना राबविणाऱ्या कृषी विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’ झाल्याची घटना पुढे आली आहे. सिव्हिल लाईन्स परिसरातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कृषी विभागातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी एस. पी. गावंडे व कृषी अभियंता शरदचंद्र जगन्नाथ पाली अशी ‘फ्री स्टाईल’ झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. मागील तीन दिवसांपासून ही ‘फ्री स्टाईल’ कृषी विभागात चर्चेचा विषय बनली आहे. वरिष्ठ अधिकारी कानावर हात ठेवून, संपूर्ण घटना दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. यातून कृषी विभागाची फार मोठी नाचक्की होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या घटनेतील दोन्ही वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे या घटनेला अधिकच गांभीर्य आले आहे. माहिती सूत्रानुसार, पाली यांच्याकडे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील कृषी अधिकाऱ्यांच्या वाहनांची (चारचाकी) जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक अधिकाऱ्याकडील ड्रायव्हरला वाहनाचे ‘लॉकबुक’ प्रत्येक महिन्याला पाली यांच्याकडून मंजूर करून घ्यावे लागते. त्यानुसार एस.पी. गावंडे यांच्या ड्रायव्हरने १८ ते २० हजार रुपयांच्या डिझेल बिलांसह पाली यांच्याकडे ‘लॉकबुक’ मंजुरीसाठी सादर केले होते. परंतु गावंडे यांच्या ताब्यातील ‘बोलेरो’ या शासकीय वाहनाचे मीटर मागील काही महिन्यांपासून बंद असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाली यांनी त्या वाहनाचे लॉकबुक मंजूर न करता, संबंधित ड्रायव्हरला ‘शोकॉज’ जारी करुन, उत्तर मागितले. वाद पोहोचला पोलीस ठाण्यात नागपूर : कदाचित ती गोष्ट गावंडे यांच्या कानापर्यंत पोहोचली आणि कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी गावंडे अचानक ‘अन्कंट्रोल’ झाले. त्यांनी बाजूलाच असलेल्या पाली यांच्या कक्षात धाव घेतली; शिवाय पाली यांना काही कळण्यापूर्वीच त्यांच्यावर तीन-चार हात चढविले. दरम्यान, कृषी कार्यालयात चांगलाच गोंधळ माजला होता. दोन्ही वरिष्ठ अधिकारी असल्याने कुणीही मध्यस्थी करण्याची हिंमत करीत नव्हते. शेवटी एका अधिकाऱ्याने मध्यस्थी करून गावंडे यांना शांत केले. यानंतर पाली यांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली. त्यावर पोलीस कृषी कार्यालयात पोहोचले. मात्र त्याचवेळी कार्यालयीन अधीक्षक गजानन पाटील यांनी पाली यांची समजूत घालून पोलिसांकडील तक्रार परत घेण्याचा सल्ला दिला. त्यावर पाली यांनी पोलिसांतून माघार घेतल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार या घटनेसंबंधी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक गजानन पाटील यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, संपूर्ण प्रकरण पोलिसांत गेले होते. त्यावर लगेच पोलीस कार्यालयात धडकले होते. परंतु कार्यालयीन अधीक्षक या नात्याने आपण मध्यस्थी करून संबंधितांना पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ती मागे घेण्यात आली. त्यानंतर गावंडे व पाली या दोघांनीही आपल्याकडे वेगवेगळे अर्ज सादर करून एक-दुसऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. सोबतच या संपूर्ण घटनेचे मूळ ठरलेल्या संबंधित वाहनाच्या ‘लॉकबुक’चीसुद्धा चौकशी केली जाईल, असेही पाटील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. तसेच पाली यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले. तसेच कार्यालयीन वरिीष्ठांनी संपूर्ण घटना ही शासकीय कार्यालयात घडली असल्याने या प्रकरणाची विभागीय चौकशी केली जाईल, असा विश्वास दिला आहे. दरम्यान, आपण गावंडे यांना तात्काळ निलंबित करा अथवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लॉकबुक’ ठरले ‘फ्री स्टाईल’चे कारण माहिती सूत्रानुसार विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी एस. पी. गावंडे यांच्या ताब्यात असलेल्या ‘बोलेरो’ या शासकीय वाहनाचे मीटर मागील काही महिनाभरापासून बंद आहे. मात्र असे असताना या वाहनाच्या ड्रायव्हरने ‘लॉकबुक’वर गावंडे यांच्या प्रवासदौऱ्याची किलोमीटरप्रमाणो नोंद करून १८ ते २० हजार रुपयांच्या डिझेलची बिले पाली यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केली होती. विशेष म्हणजे, संबंधित ड्रायव्हरचा हा नेहमीचाच उद्योग असून, यापूर्वीसुद्धा असेच अनेक प्रकार घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाली यांनी यावेळी बिल मंजूर न करता, संबंधित ड्रायव्हरला ‘शोकॉज’ दिला. कदाचित संबंधित ड्रायव्हरने त्याची गावंडे यांना माहिती दिली. ते ऐकून गावंडे अचानक संतप्त झाले आणि ही घटना घडली.