शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी म्हणून दुकानावर कब्जा

By admin | Updated: November 13, 2015 02:57 IST

कुख्यात गुंडाच्या मदतीने खंडणी म्हणून दुकानावर कब्जा केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. तरारे यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

न्यायालयाने फेटाळला आरोपीचा अटकपूर्व जामीननागपूर : कुख्यात गुंडाच्या मदतीने खंडणी म्हणून दुकानावर कब्जा केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. तरारे यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. सोनू ऊर्फ शेख रिजवान शेख रशीद, असे आरोपीचे नाव असून तो दहीबजार झाडे चौक येथील रहिवासी आहे. प्रकरण असे की, प्रेमनगर श्रीराम वाडी येथील मुरारी मानूलाल गुप्ता (५०) यांनी आरोपी शेख रिजवानचे वडील अब्दुल रशीद छोटे मियाँ (६०) याच्याकडून भाड्याने दुकान घेतले होते. यासाठी १ लाख ३० हजार रुपये पगडी दिली होती. दुकान सोडताना मुरारी गुप्ता यांनी आपली पगडीची रक्कम परत मागितली होती. त्यामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. ९ आणि १२ आॅगस्ट २०१५ या दरम्यान शेख रिजवान याने आपल्या साथीदारांना एकत्र करून मुरारी गुप्ता यांना बांबूच्या काठीने जबर मारहाण केली होती. या घटनेनंतर कुख्यात गुंड वसीम चिऱ्या याने या प्रकरणात मध्यस्त करून देतो, असे गुप्ता यांना म्हटले होते. त्याने आपल्या साथीदारांसह गुप्ताच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पगडीचे पैसे परत करण्याऐवजी उलट खंडणी म्हणून गुप्ता जवळून दुकानाची चाबी हिसकावली होती. दुकानात परत आल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी गुप्ताच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी ६ आॅक्टोबर २०१५ रोजी रिजवान, वसीम चिऱ्या, छोटा वसीम, निसार, गोलू, अय्याज, बाशीद पटेल सर्व रा. शांतीनगर यांच्याविरुद्ध भादंविच्या ३८४, ३८६, २९४, १४१, १४३, १४५, १४७, १४९ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्या पैकी शेख रिजवान याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता तो न्यायालयाने फेटाळला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. निकम हे तपास अधिकारी आहेत.