शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाची विक्री करणारे गजाआड

By admin | Updated: January 13, 2017 02:07 IST

रस्त्यावर दुकान मांडून घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांच्या प्रतापनगर आणि पाचपावली पोलिसांनी मुसक्या बांधल्या.

तीन आरोपी : प्रतापनगर आणि पाचपावली पोलिसांची कारवाई नागपूर : रस्त्यावर दुकान मांडून घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांच्या प्रतापनगर आणि पाचपावली पोलिसांनी मुसक्या बांधल्या. या तिघांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असून पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मांजा जप्त केला आहे. दुसऱ्याची पतंग कापण्यासाठी पतंगबाज घातक नायलॉन मांजाचा सर्रास वापर करतात. या मांजामुळे पतंगा तर कटतातच मात्र दरवर्षी अनेक निरपराधांचे बळीही जातात. कित्येक जण जखमी होतात. माणसांप्रमाणेच आकाशात उडणारे पक्षीही मांजाचे बळी ठरतात. मांजा घातक असल्यामुळे कोर्टाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीसुद्धा गल्लाभरू डोक्याचे व्यापारी या घातक मांजाची अनेक ठिकाणी सर्रास विक्री करताना दिसतात. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी अशाप्रकारे मांजा विकला जात असल्याची माहिती कळताच ठाणेदार शिवाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक ज्ञानेवर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जे. ए. गुरुनुले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खामल्यातील संजय प्रकाश गोलाणीच्या दुकानात धाड घातली. त्याच्याकडून १२ चकऱ्या मांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली.गुरुवारी अशाच प्रकारे पाचपावलीतील बाळाभाऊ पेठेत नायलॉन मांजा विकणारे निखील (वय २१) आणि त्याचा भाऊ सनी रामदास उमरेडकर (वय २१) यांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा आणि तो गुंडाळण्यासाठी वापरली जाणारी मशिन असा एकूण सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली. मंगळवारी सायंकाळी अशाच प्रकारे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपी मोहम्मद शफी शेख अब्बास (वय ४०) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. (प्रतिनिधी)धडक कारवाईची गरजसंक्रातीच्या सणाच्या निमित्ताने पतंगबाजीला सर्वत्र उधाण आले आहे. पतंग आणि मांजाचीही मागणी वाढली आहे. अनेक पतंग विक्रेते अजूनही सर्रास घातक मांजाची विक्री करताना दिसतात. प्रत्येकच पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी मांजा विक्री केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली एकट दुकट कारवाई करण्याऐवजी धडक कारवाईची मोहीम राबवावी. त्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. अनेकांना दुखापत होण्यापासूनही बचाव होऊ शकतो.