आता एक लाख घरांच्या छतावर सोलर; राज्यात नागपूर परिमंडळाचा वाटा १७.७८ टक्के

By आनंद डेकाटे | Updated: May 11, 2026 19:03 IST2026-05-11T18:59:13+5:302026-05-11T19:03:03+5:30

Nagpur : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर-मुफ्त बिजली योजना’मुळे महावितरणच्या नागपूर परिमंडळात सौर क्रांती घडली आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या परिमंडळात १ लाख ७०८ ग्राहकांच्या घरांच्या छतांवर रूफ टॉप सोलर प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

Now solar on the roofs of one lakh houses; Nagpur circle's share in the state is 17.78 percent | आता एक लाख घरांच्या छतावर सोलर; राज्यात नागपूर परिमंडळाचा वाटा १७.७८ टक्के

Now solar on the roofs of one lakh houses; Nagpur circle's share in the state is 17.78 percent

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर-मुफ्त बिजली योजना’मुळे महावितरणच्या नागपूर परिमंडळात सौर क्रांती घडली आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या परिमंडळात १ लाख ७०८ ग्राहकांच्या घरांच्या छतांवर रूफ टॉप सोलर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण प्रकल्पांमध्ये या परिमंडळाचा सहभाग १७.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

या यशामध्ये नागपूर जिल्ह्याचे सर्वाधिक योगदान आहे. येथे ८२,६०१ ग्राहकांनी सौर ऊर्जेचा स्वीकार केला आहे. तर वर्धा जिल्ह्यातील १८,१०७ ग्राहकांनीही सौर ऊर्जेला पसंती दिली आहे. या १ लाख ७०८ सोलर रूफ टॉप प्रकल्पांची एकूण वीज निर्मिती क्षमता ३८२.६ मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्याची ३१७.८२ मेगावॅट तर वर्धा जिल्ह्याची ६४.७६ मेगावॅट इतकी हिस्सेदारी आहे.

महाराष्ट्रात ५.६८ लाख ग्राहक

महाराष्ट्रात महावितरणच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत ५ लाख ६८ हजार २९३ ग्राहकांनी ‘प्रधानमंत्री सूर्यघर-मुफ्त बिजली योजना’चा लाभ घेत सोलर रूफ टॉप प्रकल्प बसवले आहेत. या प्रकल्पांची एकूण वीज निर्मिती क्षमता २१५१.६९ मेगावॅट झाली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळत आहे.

७८ हजारांपर्यंत अनुदान

या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून अनुदान दिले जात आहे. त्यानुसार १ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रूफ टॉपसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि ३ किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. प्रकल्पासाठी झालेला खर्च ३ ते ४ वर्षांत वसूल होतो. तसेच ‘नेट मीटरिंग’मुळे अतिरिक्त वीज निर्मितीतून उत्पन्नही मिळते. महावितरणकडून ही रक्कम वीज बिलामध्ये समायोजित केली जाते.

Web Title : नागपुर क्षेत्र रूफटॉप सोलर अपनाने में महाराष्ट्र में सबसे आगे: 17.78% हिस्सेदारी

Web Summary : नागपुर मंडल पीएम सूर्य घर योजना के तहत 1.07 लाख रूफटॉप सौर परियोजनाओं के साथ महाराष्ट्र में सबसे आगे है। नागपुर जिले का 82,601 प्रतिष्ठानों के साथ महत्वपूर्ण योगदान है। लाभार्थियों को ₹78,000 तक की सब्सिडी मिलती है और नेट मीटरिंग के माध्यम से अतिरिक्त बिजली से कमाई होती है।

Web Title : Nagpur Region Leads Maharashtra in Rooftop Solar Adoption: 17.78% Share

Web Summary : Nagpur division leads Maharashtra with 1.07 lakh rooftop solar projects under PM Surya Ghar scheme. Nagpur district contributes significantly with 82,601 installations. Beneficiaries receive subsidies up to ₹78,000 and earn from excess electricity via net metering.