शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

आता सलाईन ‘ऑनलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:48 PM

सलाईन हे खरे तर उपयुक्त आणि जीवदान देणारे औषध. अनेक आजारांमध्ये याचा वापर अटळ असतो. परंतु रुग्णाला सलाईन लावल्यानंतर सातत्याने त्याकडे लक्ष ठेवावे लागते. सलाईन थांबली तर नाही, संपली तर नाही, हे पाहत राहावे लागते. यावर उपाय म्हणून ‘व्हीएनआयटी सेंट्रल ऑफ एक्सलन्स’ विभागाच्या एमटेक विद्यार्थ्यांनी ही ‘ऑनलाईन’ सलाईन तयार केली आहे. कुतूहल प्रदर्शनात हे उपकरण आकर्षण ठरले.

ठळक मुद्दे‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांनी तयार केले अ‍ॅप : कुतूहल प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलाईन हे खरे तर उपयुक्त आणि जीवदान देणारे औषध. अनेक आजारांमध्ये याचा वापर अटळ असतो. परंतु रुग्णाला सलाईन लावल्यानंतर सातत्याने त्याकडे लक्ष ठेवावे लागते. सलाईन थांबली तर नाही, संपली तर नाही, हे पाहत राहावे लागते. यावर उपाय म्हणून ‘व्हीएनआयटी सेंट्रल ऑफ एक्सलन्स’ विभागाच्या एमटेक विद्यार्थ्यांनी ही ‘ऑनलाईन’ सलाईन तयार केली आहे. कुतूहल प्रदर्शनात हे उपकरण आकर्षण ठरले.विज्ञान भारती, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट व विश्वेश्वरय्या राष्ट्रीय औद्योगिक संस्थानच्या (व्हीएनआयटी)वतीने आयोजित ‘कुतूहल’ या नाविन्यपूर्ण व आगळेवेगळे प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसह नागरिकांची गर्दी उसळली.‘ऑनलाईन सलाईन’ हे उपकरण विभागाचे डॉ. अविनाश केसकर व डॉ. अश्विनी कोठारी यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आले. अधिक माहिती देताना ‘व्हीएनआयटी’चा विद्यार्थी योगेश नांदूरकर म्हणाला, सलाईन संपल्यावर अनेकदा रक्त ‘रिव्हर्स’ येते, शिरेमध्ये हवा जाऊन गाठ निर्माण होण्याची शक्यता असते, जी पुढे धोकादायक ठरू शकते. यावर हे ‘ऑनलाईन सलाईन’ उपयुक्त ठरते. सलाईन एका ‘डिव्हाईस’शी जोडून यासाठी एक अ‍ॅप तयार करण्यात आले. हे ‘अ‍ॅप’ संबंधित डॉक्टर, परिचारिका किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी डाऊनलोड केल्यास त्यांना सलाईनची स्थिती मोबाईलवर दिसून येते. सलाईन संपण्याच्या स्थितीत आल्यावर ‘व्हाईस मॅसेज’, ‘टेक्स्ट मॅसेज’ देते, संपल्यावर ‘अलार्म’ही वाजतो. हे उपकरण तयार करण्यास मोनाली हिंगणे, योगेश नांदूरकर, रसिका देशपांडे, पूजा मधुमटके, अपर्णा मर्जीवे, रोमा गायल आदींनी सहकार्य केले.रुट कॅनल ‘लेझर’द्वारेशासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंत शल्यशास्त्र विभागाचा स्टॉल्सवर दुखरा दात वाचविण्यासाठी रुट कॅनल कसे केले जाते, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. हे देताना या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी सांगितले, दात किडला की प्रत्येक वेळी ‘रुट कॅनल’च करावे लागते असे नाही. पण दाताची कीड त्याच्या आतील संवेदनाक्षम भागापर्यंत पोहोचून असह्य ठणका लागतो तेव्हा मात्र रुट कॅनल उपचाराने दात वाचवणे शक्य आहे. या रुट कॅनलमध्ये आता ‘लेझर’चाही वापर होऊ लागला आहे; शिवाय ‘एन्डोडॉन्टीक्स मायक्रोस्कोप’मुळे आणखी अचूकता आली आहे. या उपचार पद्धतीमुळे दात काढण्याचे प्रमाण कमी झाले असून आयुष्यमान सुधारले आहे.अंधांसाठी ‘ब्लाईंड नेव्हीगेशन’मार्गक्रमण करताना खाचखळग्याचा अचूक शोध घेण्यासाठी ‘पांढरी काठी’अंधांना दिशा देणारी ठरते. परंतु अनेकदा गर्दीच्या ठिकाणी अडचणीचेही जाते. याची दखल घेत ‘व्हीएनआयटी सेंट्रल ऑफ एक्सलन्स’ विभागाच्या एमटेक विद्यार्थ्यांनी ‘ब्लाईंड नेव्हीगेशन’ हे खास उपकरण अंध बांधवांसाठी तयार केले आहे. उजव्या हातात हे उपकरण घातल्यास त्याला लागलेल्या सेन्सर्समुळे पुढे काही आल्यास किंवा खड्डा असल्यास किंवा डोक्यावर काही आल्यास ‘व्हायब्रेट’ करते, आणि पुढीला धोका टाळता येतो. हे उपकरणही डॉ. अविनाश केसकर व डॉ. अश्विनी कोठारी यांच्या मार्गदर्शनात योगेश नांदुरकर, मोनाली हिंगणे, रसिका देशपांडे, पूजा मधुमटके, अपर्णा मर्जीवे, रोमा गायल आदींच्या सहकार्यातून तयार केले आहे.आत्महत्या की खून, असा लावला तपासशासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख प्रा. आशिष बडिये यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी तीन दिवस तीन वेगवेगळे घटनाक्रम ‘स्टॉल’वर प्रदर्शित केले. यात सादर केलेली घटना आत्महत्या की खून, असा प्रश्न थेट दर्शकांना विचारला जात होता. त्यावर उत्तर आत्महत्या असावी, असे उत्तर येताच, हे प्रकरण खुनाचे असून आत्महत्या असल्याचा कसा देखावा करण्यात आला, याचे विश्लेषण व पुरावे देताच आश्चर्यव्यक्त करीत होते. ‘लाईट डिटेक्टर’च्या मदतीने खोटे बोलणे कसे पकडता येते याची प्रात्यक्षिकासह प्रा. बडिये यांनी माहिती दिले. त्या मागील कारणेही त्यांनी सांगितली. यासह स्वाक्षरीतून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, गुन्ह्याच्या घटनेत बोटांचे ठसे कसे घेतले जातात, कवटीवरील खुणाच्या मदतीने तो पुरुष आहे, की स्त्री, त्याचे वय काय, शरीरात शिरलेली गोळी कोणत्या बंदुकीच्या प्रकारातील आहे, याची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली.

टॅग्स :Medicalवैद्यकीयtechnologyतंत्रज्ञान