शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

आता मनपा करणार सर्व झोपडपट्ट्यांचा विकास

By admin | Updated: May 9, 2015 02:20 IST

महापालिकेच्या हद्दीतील सर्व ४२४ झोपडपट्ट्यांचा विकास आता महापालिका स्वत: करेल.

नागपूर : महापालिकेच्या हद्दीतील सर्व ४२४ झोपडपट्ट्यांचा विकास आता महापालिका स्वत: करेल. फोटो ओळखपत्र देण्यापासून ते मालकी हक्काचे पट्टे देण्यापर्यंत व सोबतच येथील विकास कामे करण्यासाठी आता दुसऱ्या प्राधीकरणाची किंवा विभागाची परवानगी घेण्याची गरज पडणार नाही. राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागातर्फे या संबंधीची अधीसूचना जारी करण्यात आली असून महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) यांना सक्षम प्राधीकारी म्हणून नियुक्त केले आहे. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये पथदीवे, पाणीपुरवठा, रस्ते आदी कामे महापालिका करते. मात्र महापालिकेकडे अधिकृतरित्या शहरातील १४ झोपडपट्ट्यांचा अधिकार नव्हता. आता या अधीसूचनेमुळे शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग अप्रत्यक्षपणे मोकळा झाला आहे. मनपाच्या स्लम विभागाची जबाबदारी देखील वाढली आहे. झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखविली होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नासुप्रमध्ये विकास कामांबाबत बैठक झाली होती. त्यातही महापालिकेला सर्व झोपडपट्ट्यांचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती. २३ एप्रिल २०१५ रोजी जारी करण्यात आलेल्या अधीसूचनेत स्पष्ट उल्लेख आहे की, राज्यपालांच्या आदेशानुसार संबंधित निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधार, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ मध्ये सुधारणा करून नागपूर महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) यांना सक्षम प्राधिकारी नेमण्यात आले आहे. यामुळे नागपूर महापालिकेला आता महापालिकेच्या जमिनीवर असलेल्या, महापालिकेच्या हद्दीत नासुप्रच्या जमिनीवर असलेल्या, शासकीय जमिनीवरील, खासगी जमिनीवरील सर्व झोपडपट्ट्यांचे अधिकार मिळाले आहेत. अपील प्राधिकारी म्हणून नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जबाबदारी वाढली : नेरळ महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) सतीश नेरळ यांनी अधिसूचना प्राप्त झाली असल्याचे सांगितले. झोपडपट्टीवासीयांना फोटो ओळखपत्र देण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी आवश्यक असलेले अर्ज देखील संबंधित प्राधीकरणाकडून प्राप्त झाले आहेत. नझूलच्या जमिनीवरसर्वाधिक झोपडपट्टीशहराच्या हद्दीत असलेल्या झोपडपट्ट्यांची गणना करण्यात आली होती. त्या वेळी ४२४ झोपडपट्ट्या निश्चित करण्यात आल्या होत्या. २००२ पूर्वीच्या झोपड्यांना अधिकृत मानले जाईल. नझूलच्या जमिनीवर सर्वाधिक २३७ झोपडपट्ट्या आहेत. याशिवाय नासुप्रकडे ४० झोपडपट्ट्या आहेत.