शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नदी पात्रातील झोपडपट्टीधारकांना नोटीस

By admin | Updated: May 15, 2016 02:47 IST

पावसाळ्यात पिवळी नदी व चांभार नाला परिसरातील वस्त्यांना पुराचे पाणी शिरण्याचा धोका असतो.

शहरातील १२१ ठिकाणे धोकादायक : ३८०० कुटुंबांना धोका नागपूर : पावसाळ्यात पिवळी नदी व चांभार नाला परिसरातील वस्त्यांना पुराचे पाणी शिरण्याचा धोका असतो. अनेकदा प्राणहानी होण्याचा धोका असतो. ही बाब विचारात घेता नदी व नाल्यातील गाळ काढण्यासोबतच नदीपात्रातील झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. महापालिकेच्या मंगळवारी व आशीनगर झोन कार्यालयांनी नदी पात्रातील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याला सुरुवात केली आहे. महापालिके च्या आपत्ती निवारण विभागाने पावसाळ्यात पाणी शिरण्याची शक्यता असलेली नागपूर शहरातील १२१ ठिकाणे व वस्त्या धोकादायक ठरविल्या आहेत. अतिवृष्टी व पूर आल्यास या वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका असतो. यामुळे ३८०० कुटुंंबांना धोका निर्माण होतो. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या वस्त्यांतील लोकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले आहे. आपत्ती निवारणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नदी व नाल्यातील गाळ व कचरा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पिवळी नदी काठावर वा नदीपात्रात ४०० अतिक्रमणे आहेत. गंगानगर, गोदावरीनगर, सूरजनगर, पलोटीनगर आदींचा यात समावेश आहे. यातील ३०० झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)नियमाचे उल्लंघन करून बांधकामनियमानुसार नदी पात्रात ५०० मीटर परिसरात कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम करता येत नाही. परंतु शहरातील सर्वच नद्यांच्या काठावर अतिक्रमण करण्यात आले आहे. नियमाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. काही भागातील अतिक्रमण वर्षानुवर्षे असल्याने ते काढणे शक्य नाही. परंतु अलिकडील काही वर्षात वसलेल्या झोपड्या हटविण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पिवळी नदी पात्रात २२०० अतिक्र मणआशीनगर झानेच्या हद्दीतील पिवळी नदी पात्रात २२०० अतिक्र मण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना आठवडाभरात अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टीचा भाग, धरमपेठ विद्यालयाच्या मागील भाग, तेलंगखेडी तलावाचा परिसर, शीलानगर, गवळीपुरा, पांढराबोडी, हजारी पहाड, गांधीनगर झोपडपट्टी, संजयनगर, शिवाजीनगर, आदर्शनगर, ताजनगर, वांजरा, वांजरी, नारी, झिंगाबाई टाकळी, सक्करदरा भागातील झोपडपट्ट्या, पोहरा नदी काठावरील वस्त्यांना पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका असतो.