शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

हरित न्यायाधिकरणची केंद्र व राज्य शासनाला नोटीस

By admin | Updated: May 16, 2016 03:13 IST

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने गुणवत्तापूर्ण कोळशाविषयीच्या नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे केंद्रीय कोळसा

आदेशाची अवमानना : दर्जाहीन कोळशाचा पुरवठा व वापराचे प्रकरणनागपूर : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने गुणवत्तापूर्ण कोळशाविषयीच्या नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे केंद्रीय कोळसा व ऊर्जा मंत्रालय, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल इंडिया, वेकोलि, राज्याचे ऊर्जा व पर्यावरण मंत्रालय, महाजनको व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना नोटीस बजावून १३ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.यासंदर्भात महादुला येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप रंगारी यांनी न्यायाधिकरणात अर्ज सादर केला आहे. पर्यावरण मंत्रालयाने २ जानेवारी २०१४ व २५ आॅगस्ट २०१५ रोजी अधिसूचना जारी करून राखेचे प्रमाण ३४ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या कोळशाचा पुरवठा व उपयोग करणे बंधनकारक केले आहे. देशात गुणवत्तापूर्ण कोळशाविषयीचे नियमही अस्तित्वात आहेत. असे असताना कोळसा उत्पादक कंपन्या वीज कंपन्यांना दर्जाहीन कोळशाचा पुरवठा करतात. तसेच, वीज निर्मिती कंपन्याही हा कोळसा सर्रास वापरतात. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून वीज निर्मिती प्रकल्पांतील यंत्रेही खराब होत आहेत असे अर्जदाराचे म्हणणे आहे.न्यायाधिकरणने १५ आॅक्टोबर २०१५ रोजी आदेश जारी करून प्रतिवादींना विविध निर्देश दिले होते. कोळसा व वीज निर्मिती कंपन्यांनी गुणवत्तापूर्ण कोळशाविषयीच्या नियमांचे आणि पर्यावरण मंत्रालयाच्या दोन अधिसूचनांचे काटेकोर पालन, दर्जाहीन कोळसा बाहेर काढून टाकण्यासाठी आॅनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम उभारावी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दर महिन्याला कोळशातील राखेचे प्रमाण तपासून घ्यावे इत्यादी निर्देशांचा आदेशात समावेश होता. प्रतिवादींनी या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. परिणामी न्यायाधिकरणचे न्यायिक सदस्य डॉ. जवाद रहीम व तज्ज्ञ सदस्य डॉ. अजय देशपांडे यांनी प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. तसेच, कोळसा व वीज निर्मिती कंपन्यांना त्यांची परवानगी का काढून घेण्यात येऊ नये, अशी विचारणा करून उत्तर मागितले आहे.(प्रतिनिधी)