शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नामनिर्देशित सदस्यसंख्या अपूर्णच

By admin | Updated: October 24, 2016 02:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरणावर राज्य शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाच्या

नागपूर विद्यापीठ : अद्यापही विधिसभेत १४ सदस्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरणावर राज्य शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर कुलगुरूंद्वारे नामनिर्देशित सदस्यांची वर्णी लागली आहे. कुलगुरूंनी विधिसभेवर पाच सदस्यांचे नामनिर्देशन केले असले तरी विद्यापीठ कायद्यानुसार ही संख्या आणखी १४ ने वाढू शकते. विधिसभेतील सदस्यसंख्या वाढली असली तरी अद्यापही इतर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षाच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.विद्यापीठातील निवडणुकांना ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत स्थगिती देण्यात आली असली तरी यापुढे प्राधिकरणांत विद्यापीठातील पदावरील अधिकाऱ्यांसोबतच विविध नामित सदस्यांचादेखील समावेश राहणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे राजपत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी विधिसभा, विद्वत् परिषद, बीसीयूडी, परीक्षा मंडळ आणि निरंतर व प्रौढ शिक्षण मंडळावर एकूण १७ सदस्यांना नामित केले आहे. विधिसभेत त्यांनी पाच सदस्यांना नामनिर्देशित केले. यात डॉ.एम.व्ही.खापर्डे, डॉ.मोहन काशीकर, डॉ.शैलेंद्र लेंडे, सतीश होले, मोहन रामटेके यांचा समावेश आहे. मात्र कुलगुरू त्यांच्या अधिकारात जिल्हा परिषद, महानगरपालिका सदस्यांनादेखील नामित करू शकतात. या सदस्यांच्या नावाची घोषणाच झालेली नाही. अद्याप महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहितादेखील लागू झालेली नाही. अशा स्थितीत या सदस्यांच्या नावाची घोषणा का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)