शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिपूर्ती नाही तर प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

आरटीईच्या प्रतिपूर्तीसाठी संस्थाचालक संघटना शिक्षण विभागाला इशारा नागपूर : आरटीईअंतर्गत दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण देण्यात येते. त्याबदल्यात शासनाकडून ...

आरटीईच्या प्रतिपूर्तीसाठी संस्थाचालक संघटना शिक्षण विभागाला इशारा

नागपूर : आरटीईअंतर्गत दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण देण्यात येते. त्याबदल्यात शासनाकडून शाळांना प्रतिपूर्ती देते. पण २०१७-१८ पासून आरटीईची प्रतिपूर्ती शाळांना मिळाली नाही. कोरोनामुळे २०२०-२१ या सत्रात पालकांनी फीसुद्धा भरलेली नाही. त्यामुळे शिक्षण संस्थाचालकांनी आरटीईच्या प्रतिपूर्तीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात आरटीईची प्रतिपूर्ती मिळाली नाही तर प्रवेशदेखील देणार नाही, असा इशारा संस्थाचालकांनी दिला.

आरटीई फाऊंडेशनतर्फे आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात सोमवारी शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांच्याशी प्रतिपूर्तीसंदर्भात चर्चा करण्यात आली. संघटनेच्या मते, २०१७-१८ ला आरटीईचे शाळांना फक्त ५० टक्के निधी मिळाला. २०१८-१९ मध्ये २८.५ टक्के निधी देण्यात आला. २०१९-२० व २०२०-२१ या वर्षात एक रुपयाचा निधीसुद्धा मिळाला नाही. सत्र २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे पालकांनी शाळांची फीसुद्धा भरलेली नाही. त्यामुळे शाळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात २०२१-२२ या सत्रासाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शाळांना तातडीने निधी वाटपाची प्रक्रिया सुरू करावी, निधी वाटप करताना अनावश्यक माहिती मागू नये, अशी मागणी फाऊंडेशनतर्फे करण्यात आली. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन काळबांडे, सचिव अर्चना धबाले, राजेंद्र अतकर, रमेश डोकरीमारे, अर्चना देवतळे, रमेश शेंडे, प्रदीप सुतोणे, डॉ. प्रकाश नेऊलकर, आशिष वरघने, अरुण हुसकुले, दीपिका ठाकूर, प्रगती शिंदे, मधुकर दळवेकर आदी उपस्थित होते.

- मेस्टातर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

मेस्टा या संघटनेतर्फे आरटीईच्या प्रतिपूर्तीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागपूर विभागाचे अध्यक्ष खेमराज कोंडे, सचिव कपिल उमाळे, संजय खोब्रागडे, मोहम्मद आबिद, विजय लेंडे, ज्योती लांबट, मंगला अदाने आदी उपस्थित होते. संघटनेने आरोप केला की, आरटीईचे ४८१ कोटी रुपये सरकारने सर्व शिक्षा अभियानात वळते केले. आरटीईची प्रतिपूर्ती न मिळाल्यास प्रवेश देणार नाही, असा इशारा संघटनेचे सचिव कपिल उमाळे यांनी दिला.