शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ना रक्ततपासणी, ना सोनोग्राफी, १० ते १५ टक्के महिला थेट प्रसूतीलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : बाळाचा जन्म हा कुटुंबात सर्वांत आनंदाचा क्षण मानला जाताे. महिलेची गर्भधारणा झाल्यापासून प्रसूतीपर्यंत सर्व प्रकारच्या चाचण्या व ...

नागपूर : बाळाचा जन्म हा कुटुंबात सर्वांत आनंदाचा क्षण मानला जाताे. महिलेची गर्भधारणा झाल्यापासून प्रसूतीपर्यंत सर्व प्रकारच्या चाचण्या व साेनाेग्राफी आईच्या आराेग्यासाठी आणि बाळाच्या सुखरूप जन्मासाठी महत्त्वाच्या असतात. मात्र काेराेनामुळे या आवश्यक चाचण्यांचे प्रमाण कमी झाले व थेट प्रसूतीला जाण्याचे गंभीर प्रकार दिसून आले. जिल्ह्यात अशा गर्भवती महिलांचे प्रमाण १० ते १५ टक्के हाेते. यामुळे व्यंगबाळ जन्माला येण्याचे किंवा ऐनवेळी चाचण्या केल्याने गर्भपात करावे लागण्याचे प्रमाणही वाढल्याचे निदर्शनास आले.

काेराेनाच्या प्रकाेपामुळे अनेक गाेष्टींना अडथळे निर्माण झाले. विशेष म्हणजे गर्भवती महिलांनाही अनेक प्रकारचे त्रास भाेगावे लागले. उल्लेखनीय म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत प्रसूतीचे प्रमाणही घटले आहे. २०१९ मध्ये शहरात ५३ हजारांवर बाळजन्मांची नाेंद झाली. २०२० मध्ये घटून ती ४४ हजारांवर आली. २०२१ मध्ये पहिल्या पाच महिन्यांत त्यापेक्षा कमी प्रसूती झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यापेक्षा गंभीर म्हणजे गर्भधारणेनंतर आवश्यक असलेल्या चाचण्या करण्याचेही प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. शहरातील स्त्रीराेग व प्रसूतितज्ज्ञ डाॅ. चैतन्य शेंभेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात त्यांच्याकडे सव्वाशेच्या जवळपास प्रसूती झाल्या. त्यांपैकी ८२ ते ८५ प्रसूती सुखरूप झाल्या. मात्र काही महिलांना त्रासाचा सामना करावा लागला, तर १० प्रकरणांत ऐनवेळच्या तपासणीत बाळ व्यंग आढळल्याने गर्भपात करावा लागला. दुसऱ्या लाटेदरम्यान या समस्या वाढल्याचे दिसून आले.

स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. राेहिणी पाटील यांनी सांगितले, काेराेनाकाळात अनेक महिलांनी प्रसूतिपूर्व चाचण्या करण्याचे टाळले. काहींनी काैटुंबिक अडचणीमुळे तर अनेकींनी काेराेना टेस्ट करण्याच्या भीतीमुळे साेनाेग्राफी व आवश्यक चाचण्या वेळेवर केल्या नाही. काही घरात काेराेना रुग्ण असल्याने किंवा कुणाचा मृत्यू झाल्याने येऊ शकल्या नाही. व्यंग बाळ जन्माचे प्रमाण कमी असले तरी हा प्रकार झाला. हा प्रकार सुदृढ बाळाच्या जन्मासाठी व मातेच्या आराेग्यासाठी धाेकादायक आहे.

प्रसूतीपर्यंतच्या चाचण्या

- ६ आठवड्यांत पहिली साेनाेग्राफी; तसेच रक्ततपासणी, हिमाेग्लाेबिन, सिकलसेल, थायराॅईड, ब्लड शुगर, एचआयव्ही गरजेची.

- १३ आठवडे : एनटी स्कॅन व डबल मार्कर टेस्ट तसेच साेनाेग्राफी अत्यावश्यक.

- १९ आठवडे : रक्ततपासणी व साेनाेग्राफी अत्यावश्यक.

- २४ आठवडे : बाळाचे ईकाे व ब्लड शुगर टेस्ट. हार्टबिट, किडनी, रक्तप्रवाह व पाण्याचे प्रमाण याेग्य आहे की नाही.

- २८ आठवडे : साेनाेग्राफी

- ३६ आठवडे : साेनाेग्राफी व ब्लड टेस्ट.

साेनाेग्राफी, चाचण्या आवश्यकच : डॉ. शेंभेकर (फोटो)

प्रसूतिरोगतज्ज्ञ डाॅ. चैतन्य शेंभेकर यांच्या मते गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत प्रत्येक टेस्ट व साेनाेग्राफी आवश्यक आहे; पण काही अत्यावश्यक आहेत. १३ व १९ आठवड्यांची टेस्ट व साेनाेग्राफी करणे गरजेचे आहे. यामुळे गर्भामध्ये काही व्यंग आहे का, बाळाला काही समस्या आहेत का, मेंटल रिटार्डेशन किंवा डाऊन सिन्ड्राेम आहेत का, हे लक्षात येते. साडेचार महिन्यांनंतरच्या तपासणीमध्ये बाळाचे हार्टबिट, किडनी व इतर अवयव याेग्य पद्धतीने विकसित झाले की नाही, ते लक्षात येते. व्यंग आढळल्यास उपाययाेजना करण्यात येते किंवा नाहीच शक्य झाले तर २० आठवड्यांच्या आत कायदेशीररीत्या गर्भपात करता येते. मात्र या चाचण्या चुकल्या तर ऐनवेळी उपाय करणे अडचणीचे जाते आणि माता व बाळाच्या जिवाला धाेका निर्माण हाेऊ शकताे.

कोट..

रुग्णालयात कुठलीही गर्भवती महिला आली तर सर्व प्रकारची तपासणी व साेनाेग्राफी करणे बंधनकारक आहे. ती रुग्णालयातून करा किंवा बाहेरून. गेल्या वर्षभरातही चाचण्या टाळल्याचे प्रकार झाले नाही. व्यंग बाळ जन्मल्याचीही नाेंद रुग्णालयात नाही.

- डाॅ. प्रशांत उईके, विभागप्रमुख, स्त्रीराेग व प्रसूती विभाग, मेयाे