शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गर्भातील बाळाला नाही कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:41 IST

गर्भवती महिला कोरोना बाधित झाली तरी तिच्या पोटातील बाळापर्यंत हा विषाणू पोहचू शकत नाही, असा विश्वास प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देघाबरू नका, काळजी घ्या, डॉक्टरांशी संपर्क ठेवा : रोहिणी पाटील यांचे आवाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : गर्भवती महिला कोरोना बाधित झाली तरी तिच्या पोटातील बाळापर्यंत हा विषाणू पोहचू शकत नाही, असा विश्वास प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी दिला. गर्भाशयाचे प्लॅसेंटल बॅरियर हा विषाणू पार करीत नाही. चीन किंवा इतर देशात अशाप्रकारे गर्भवतींच्या बाळापर्यंत विषाणू पोहचण्याचे प्रकरण अद्याप तरी समोर आले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्र वेगाने होत असताना गर्भवती असलेल्या महिलांमध्ये अनेक शंकामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या विषाणूची लागण झाली तर कसे होईल, पोटातील बाळाला या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे काय, प्रसूतीमध्ये काही समस्या निर्माण होतील काय, गर्भपाताचा (अबॉर्शन) प्रसंग येतो काय, डॉक्टरांशी कसे भेटावे, अशा नानाविध प्रश्नांची गर्दी त्यांच्या मनात आहे व त्यांची भीती वाढली असून डॉक्टरांना याबाबत विचारणा केली जात आहे. डॉ. रोहिणी पाटील यांनी याप्रकारची कुठलीही शक्यता नाकारली आहे. बाधित महिलेच्या पोटातील बाळापर्यंत इन्फेक्शन पोहचण्याचे कोणतेही प्रकरण सध्यातरी समोर आले नाही. गर्भपात करण्याचाही धोका नसून सामान्य महिलांप्रमाणेच त्यांचीही प्रसूती होते. त्यामुळे या शंका घेऊन घाबरण्याचे कारण नाही, असा विश्वास डॉ. पाटील यांनी दिला.खरे तर गर्भवती महिलांची रोग प्रतिकारशक्ती सामान्य माणसांपेक्षा आधीच कमी असते. त्यामुळे केवळ कोरोना नाही तर कोणतेही आजार किंवा विषाणूचा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता गर्भवती महिलांनाच असते. त्यामुळे काळजी घेण्याचीही त्यांनाच सर्वाधिक गरज असते. विलगीकरण केल्याने व काळजी घेतल्याने कोरोनाचे इन्फेक्शन आपोआप दुरुस्त होत असले तरी त्याची लागण होण्याचा धोका अधिक आहे. गर्भवती महिलेला मधुमेह किंवा अस्थमाचा आजार असेल तर हा धोका अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळे सामान्य माणसांप्रमाणेच काळजी घ्यावी पण गर्भवती असल्याने इतरांशी कमीतकमी संपर्क येईल असे प्रयत्न करावे. बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवा आणि रक्तस्त्राव, पाणी जाणे, पोटात दुखणे (लेबर पेन) आदी आकस्मिक गरज वाटल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा आदी सूचना त्यांनी दिल्या आहेत. गर्भधारण व प्रसूती कायमच आपत्कालीन असते, त्यामुळे शक्यतो सर्व प्रकारची काळजी घेऊन या परिस्थितीत स्वत:ला सांभाळा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpregnant womanगर्भवती महिला