शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चपूर्वी मनपाला खर्च करावे लागणार १३६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:09 IST

नागपूर : दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या वतीने मिळालेल्या २९९ कोटी रुपयांच्या विशेष अनुदानापैकी १३१.१२ कोटी रुपये वाचले. यावर महापालिकेने ...

नागपूर : दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या वतीने मिळालेल्या २९९ कोटी रुपयांच्या विशेष अनुदानापैकी १३१.१२ कोटी रुपये वाचले. यावर महापालिकेने ५.१० कोटी रुपये व्याजही कमविले. सध्या महापालिकेच्या खात्यात १३६.२२ कोटी रुपये शिल्लक आहेत.

कोरोनामुळे खर्च न झालेला निधी ३१ मार्च २०२१ पूर्वी खर्च करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. त्यामुळे महापालिकेने १३ आवश्यक कामांची यादी तयार केली आहे. संबंधित कामांवर १५६.५९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. १३६.२२ कोटी रुपये खर्च करून उर्वरित रकमेचा वापर महापालिका आपल्यासाठी करणार आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सभागृहाला ही माहिती दिली. महापौर दयाशंकर तिवारी यांनी काही आवश्यक कामांचा यात समावेश करण्याचे निर्देश यावेळी दिले. सभागृहात आयुक्तांनी सांगितले की संबंधित रक्कम खर्च न केल्यास ही रक्कम परत जाणार आहे. यामुळे आवश्यक व रखडलेल्या कामांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर २०१८ रोजी १५० कोटी रुपये आणि ८ मार्च २०१९ रोजी १४९ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला राज्य शासनाच्या वतीने मिळाला होता. महापौर दयाशंकर तिवारी यांनी संबंधित यादीत राज्य शासनाच्या वतीने मंजूर जंबुदीपनगर नाल्याच्या १३ कोटी रुपयांच्या कामापैकी ३ कोटी रुपयांचे काम झाले आहे. तसेच सहकारनगरच्या १३.१२ कोटी रुपयांच्या प्रकल्पापैकी ५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित काम शिल्लक आहे. गीतांजली चौक ते रजवाडा चौकादरम्यान मार्गावर भूमी अधिग्रहणासाठी ११.३० कोटी रुपयांची गरज आहे. प्रमोद चिखले यांनी गांधीसागर तलावासाठी राज्य शासनाकडून मिळालेली १२ कोटी रुपयांची रक्कम खर्च करून प्रकल्पाचे काम सुरू करण्याची मागणी केली. दयाशंकर तिवारी यांची महापौर या नात्याने ही पहिली आमसभा होती. त्यांनी सदस्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

...........

प्रकल्पाचे नाव आणि खर्च होणारी रक्कम

-भांडेवाडी मार्गाच्या कामासाठी ७.५० कोटी

कारखाना व अतिक्रमण विभागासाठी मशीन ५ कोटी

अंबाझरी तलावाच्या मजबुतीकरण व सौंदर्यीकरणासाठी ३.१४ कोटी

अमृत अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी ४ कोटी

-ओसीडब्ल्यूच्या वतीने केलेली कामे १४ कोटी

-स्ट्रीट लाईटवर एलईडी लावण्यासाठी १२ कोटी

-फेज २ व ३ च्या सिमेंट रोडसाठी ६० कोटी

-विविध मार्गासाठी भूमी अधिग्रहणासाठी ३२ कोटी

-सीआरएफ अंतर्गत युटिलिटी शिफ्टींगसाठी १० कोटी

-३२ मीटर उंच हायड्रोलिक प्लॅटफार्म खरेदीसाठी ८.२६ कोटी

-८ नग १० केव्हीएचे इलेक्ट्रिक जनरेटरसाठी ०.२८ कोटी

-१६ नग इलेक्ट्रिकल सबमर्सिबल पंप ०.१० कोटी

-९ पिकअप व्हॅन फॅब्रिकेशनसाठी ०.३१ कोटी

...........

रखडलेल्या कामांसाठी तीन सदस्यांची समिती

कार्यादेश झालेली कामे सुरु झाली नसल्याचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रश्नोत्तराच्या दरम्यान उचलला. त्यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी तीन सदस्यांची समिती गठीत केल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त राहणार असून सदस्य वित्त अधिकारी आणि मुख्य अभियंता राहतील. महापौरांनी सांगितले की १० दिवसात काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समितीला आवश्यक कामांची प्राधान्य यादी करावी लागणार आहे. ११३ कोटी रुपयांची कार्यादेश झालेली कामे वर्षभरापासून रखडलेली आहेत.

...........