शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

गांधीसागर तलावाच्या स्वच्छतेसाठी निश्चय फाऊंडेशनचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

नागपूर : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या गांधीसागर तलावाच्या दैन्यावस्थेवर आणि अस्वच्छतेबद्दल कृती न करता केवळ चिंता व्यक्त करणाऱ्यांची कानउघाडणी ...

नागपूर : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या गांधीसागर तलावाच्या दैन्यावस्थेवर आणि अस्वच्छतेबद्दल कृती न करता केवळ चिंता व्यक्त करणाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर निश्चय फाऊंडेशने शनिवारी या कार्यासाठी पुढाकार घेतला. परिसरातील आणि शहरातील नागरिकांच्या सहकार्याने या तलावातील कचरा काढण्याचे आणि स्वच्छतेचे काम करण्यात आले.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आणि शहराच्या गतवैभवाची साक्ष देणाऱ्या या तलावाची अलीकडे मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. महानगरपालिका आणि अन्य एजन्सीकडे येथील स्वच्छतेचे काम आहे. मात्र बऱ्याच उणिवा आहेत. या पार्श्वभूमीवर काही नागिरकांनी निव्वळ दुर्दशा मांडणारे आणि स्वच्छतेचे आवाहन करणारे फलक या परिसरात लावले होते. दरम्यानच्या काळात तलावाच्या दुरवस्थेबद्दल जनहित याचिकाही दाखल झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करताना बॅनर लावून निव्वळ आवाहन करणाऱ्यांना सुनावले. प्रशासन त्यांच्या पद्धतीने सफाई करतेच, पण नागरिकांचेही कर्तव्य आहे. प्रशासनावर टीका करणे, आक्षेप घेणे सोपे आहे. त्यांच्यासोबत स्वच्छतेत नागिरकांचेही योगदान हवे, असे झाले तर ५० टक्के समस्या मिटतील, असे मत नोंदविले होते.

न्यायालयाच्या या कानउघाडणीनंतर निश्चय फाऊंडेशनने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. ३ मार्चला आवाहन केले. त्यानंतर शनिवारी नागरिकांच्या सहकार्याने तलावाची स्वच्छता केली. यात नागरिक, युवक सहभागी झाले होते.