शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

रस्ते अपघातात राज्यात आठ महिन्यात नऊ हजार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:15 AM

जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या आठ महिन्यात राज्यात २६,६०५ रस्ते अपघात झाले. यात ९,६८३ लोकांचे बळी गेले असून, २३,८०५ जखमी झाले.

ठळक मुद्देमुंबई, पुण्यानंतर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातांपैकी साधारण ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याची गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या आठ महिन्यात राज्यात २६,६०५ रस्ते अपघात झाले. यात ९,६८३ लोकांचे बळी गेले असून, २३,८०५ जखमी झाले. विशेष म्हणजे, अपघातात पहिल्या तीनमध्ये अनुक्रमानुसार मुंबई शहर, पुणे ग्रामीण व नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे.वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मण यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे, शिवाय प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. आठ महिन्यात सर्वाधिक २,३०५ अपघात एकट्या मुंबई शहरामध्ये झाले. दुसºया क्रमांकावर पुणे (ग्रामीण) असून १७६८ अपघात, तिसºया क्रमांकावरील नागपूर जिल्ह्यात १५७१ अपघात तर चौथ्या क्रमांकावरील नाशिक ग्रामीणमध्ये ११९४ अपघात झाले आहेत. मात्र रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पुणे ग्रामीण पहिल्या क्रमांकावर आहे. येथे ७८७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. दुसऱ्या क्रमांकावरील नाशिक ग्रामीणमध्ये ६३२ मृत्यू, तिसऱ्या क्रमांकावरील अहमदनगरमध्ये ६१७ मृत्यूमुखी पडले. नागपूर जिल्ह्यात बळींची संख्या ४२७ वर पोहचली आहे.

आठ टक्क्यांनी वाढली बळींची संख्यापरिवहन विभागाने जानेवारी ते सप्टेंबर २०१७ व जानेवारी ते सप्टेंबर २०१८ तुलनात्मक अपघातांचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या या महिन्यांमध्ये राज्यातील अपघातांच्या संख्येत किंचित घट झाली असली तरी, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. २०१७ मधील या आठ महिन्यांत २६,६४१ अपघात, ९,००१ मृत्यू तर २३,७३७ जखमी झाले आहेत तर २०१८ मधील आठ महिन्यात २६,६०५ अपघात, ९,६८३ मृत्यू तर २३,८०५ जखमींची नोंद झाली आहे. साधारण वजा ०.१ अपघात कमी झाले आहेत. मात्र मृत्यूमध्ये ८ टक्क्यांनी तर जखमींमध्ये ०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात