शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नऊ कोटी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:21 IST

जून ते आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ९६४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात ही बाब निदर्शनास आली आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाने घेतला आढावा : ९६४० शेतकरी बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून ते आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ९६४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात ही बाब निदर्शनास आली आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.कृषी विभागाने नुकसान भरपाईचा आढावा तीन भागात घेतला आहे. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेली शेती, शेत जमिनीवरील गाळ वाहून गेलेल्या परंतु दुरुस्त होणारी जमीन व खरडून गेलेल्या शेतीचा समावेश आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र ७५१९.४५ हेक्टर आहे. यात ९१६३ शेतकरी बाधित झालेले आहे. यात सोयाबीनचे नुकसान २८८८.०७ हेक्टरचे झाले आहे. तर कापूस ४४७४.८९, धान २३.५१ व तूर पिकाचे नुकसान १३२.९८ हेक्टरवर झाले आहे. ३३ टक्केपक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ६८०० रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाईच्या हिशेबाने ५ कोटी ११ लाख ३२ हजार २६० रुपये अपेक्षित आहे. तर शेत जमिनीवरील गाळ वाहून गेलेल्या परंतु दुरुस्त होणारी शेतजमीन १५.६७ हेक्टर आहे. जिल्ह्यात अशा ७३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना १२२०० रुपये हेक्टरी प्रमाणे १ लाख ९१ हजार १७४ रुपये अपेक्षित आहे. तर संपूर्ण पीकच वाहून गेलेल्या म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ १०४५.८८ हेक्टर आहे. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या २०४८ असून, ३७५०० रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळाल्यास ३ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रुपयांची अपेक्षा आहे. नुकसान झालेल्या या तीनही भागाच्या नुकसान भरपाईपोटी नऊ कोटी रुपयांची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे.तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) व नुकसान भरपाई (रुपयात)नागपूर ग्रा. ११०६.५१                              १०६६४८७८हिंगणा ११००.९४                                    ३५८३४५८०कामठी ६                                              ४०८००मौदा ३६६.९६                                       ३१९०३७६उमरेड १५०९.९०                                 १०२६७३२०भिवापूर ६०८.४८                                  ४१४६९५२कुही ३८००.१७                                    २५८४११५६सावनेर ६६.१८                                    ४५००२४पारशिवनी ०                                             ०कळमेश्वर २.६०                                   १७६८०रामटेक १३.२६                                   ९०१६८जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने तीन तालुके व आठ मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. अशावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.विनोद पाटील, सदस्य, कृषी समिती, जि.प.

 

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ