शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोग नियंत्रणासाठी संशोधन होणे आवश्यक

By admin | Updated: June 5, 2017 02:03 IST

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही निश्चितच चिंताजनक आहे. जागृती आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करोगावर मात केली जाऊ शकते.

देवेंद्र फडणवीस : कर्करोग इस्पितळाचे उद्घाटनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही निश्चितच चिंताजनक आहे. जागृती आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करोगावर मात केली जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्करोगाच्या नियंत्रणासाठी त्या दिशेने मौलिक संशोधन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कामठी मार्ग येथील ‘एचसीजी-एनसीएचआरआय’च्या (हेल्थ केअर ग्लोबल-नागपूर कॅन्सर हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट)अत्याधुनिक कर्करोग इस्पितळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, आ. डॉ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, ‘एचसीजी एनसीएचआरआय’चे अध्यक्ष डॉ. बी. एस. अजयकुमार, डॉ. अजय मेहता, डॉ. सुचित्रा मेहता, डॉ. दिनेश माधवन् इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रदूषण आणि तंबाखू सेवनामुळे कर्करोग रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत आहे. नागपुरात नव्याने उभारलेल्या रुग्णालयामुळे रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळतील. रुग्णालयातील अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे अचूक निदानासोबतच योग्य उपचार होणे शक्य होणार आहे. या रुग्णालयामुळे नागपूर आणि प्रामुख्याने मध्य भारतात कर्करोगावर संशोधन आणि उपचार उपलब्ध झाल्यामुळे कॅन्सर पीडितांना इतर ठिकाणी उपचाराला जाण्याची गरज राहिलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कर्करोगाने ग्रस्त रुग्णांचे व कुटुंबीयांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी समाजानेदेखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय ‘कॅन्सर सर्व्हायव्हल डे’च्या निमित्ताने कर्करोगाशी लढा देणारे मनीष बत्रा, अर्चना दास, गीता माथूर, डॉ. निर्मला वझे, डॉ. सुनंदा सोनालीकर, सुलक्षण सचदेव, आशिष गजभिये यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले तर डॉ. सुचित्रा मेहता यांनी आभार मानले.इतर जिल्ह्यातही कर्करोग इस्पितळकर्करोगामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावरील उपचार महागडे आहेत. रुग्णांना योग्य उपचार मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी नागपूरच्याच धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यातही कर्करोग इस्पितळ उभारण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.