नाझर व अव्वल कारकुनाला अटक

By Admin | Updated: June 12, 2014 01:02 IST2014-06-12T01:02:34+5:302014-06-12T01:02:34+5:30

देवरी येथील तहसील कार्यालयात नाझर म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६० हजार ६०५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले.

Nazr and top Karakun arrested | नाझर व अव्वल कारकुनाला अटक

नाझर व अव्वल कारकुनाला अटक

२.२१ कोटींचा अपहार : ७१ लाख ५० हजार रुपये जप्त
गोंदिया : देवरी येथील तहसील कार्यालयात नाझर म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६० हजार ६०५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले. या प्रकरणात देवरी पोलिसांनी नाझर व अव्वल कारकुनाला अटक केली आहे.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना द्यायच्या शासकीय मदतीचे धनादेश परस्पर वटवून अपहार केल्याची तक्रार तहसीलदार रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी केली होतीे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ती मदतीची रक्कम जमा करायची होती. परंतु देवरी तहसील कार्यालयाचे नाझर नामदेव शंकर बुटे याने तहसीलदारांकडून बँकेकडे देण्यात आलेले धनादेश प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर वळते न करता स्वत:च ती रक्कम काढून घेतली. या प्रकरणात देवरी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सुनील खुशाल वैरागडे याला मंगळवारच्या रात्री ९.४५ वाजता त्याच्या भंडारा येथील घरून अटक करण्यात आली. त्याच्या घरी ७१ लाख ५० हजार रुपये आढळले. ते पैसे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर बुधवारच्या सकाळी नागपूर येथून आरोपी नामदेव शंकर बुट्टे या नाझरला अटक करण्यात आली. त्या दोघांना न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nazr and top Karakun arrested