शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान राष्ट्रीय एकात्मता बंधुत्वाचा राष्ट्रगं्रंथ

By admin | Updated: November 27, 2015 03:16 IST

भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्वे, स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकास संस्कारित करणारी आहेत.

भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई : संविधानाच्या उद्देशिका शिलालेखाचे लोकार्पणनागपूर : भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्वे, स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकास संस्कारित करणारी आहेत. एकूणच भारतीय संविधान प्रत्येकाच्या प्रतिष्ठापूर्वक जगण्याशी व विकसित अस्तित्वाशी निगडित आहे. संविधान हे राष्ट्रीय एकात्मता ,बंधुत्व व देशाच्या संपन्नतेचा राष्ट्रगं्रंथ असल्याचे मनोगत डॉ. बाबासाहेब आंबेकडर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी गुरुवारी व्यक्त केले. महापालिकेतर्फे उत्तर नागपुरातील बेझनबाग येथील हर्षवर्धन बौद्ध विहारच्या पटांगणावर उभारण्यात आलेल्या १५ फूट उंचीच्या भव्य स्तंभावरील भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकेची नोंद असलेल्या शिलालेखाचे लोकार्पण भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, बसपा नेते गौतम पाटील, सभापती सुनील अग्रवाल, संदीप जाधव व राजू थूल आदी उपस्थित होते. संविधानाच्या आधारे देश चालतो. न्यायपालिकेची कार्यप्रणाली, विधिमंडळाचा कारभार चालतो. संविधानामुळेच देशाची एकात्मता व अखंडता टिकून आहे. अशा संविधानाचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संविधानाविषयी जनजागृती व संविधानाची सर्वांना ओळख व्हावी. या हेतूने महापालिकेतर्फे हा शिलालेख उभारण्यात आला आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या पर्वावर या शिलालेखाचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच बुद्ध प्रतिमेला पुष्प वाहून बुद्धवंदना घेतली. यावेळी भन्ते नागघोष यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे उपस्थिताकडून वाचन करून घेतले. यावेळी बब्बी बावा, मनोहर थूल, प्रभाकर येवले, कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर,अविनाश धमगाये, सरला बोरकर, बबली मेश्राम, विक्की कुकरेजा, रमेश वानखेडे, शालू मडके, अनिता मडके, रिता बर्मन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)