शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उद्यापासून संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशपातळीवरील समन्वय बैठकीचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशपातळीवरील समन्वय बैठकीचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात हे आयोजन होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह महत्त्वाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील.

संघाच्या कार्यप्रणालीत बैठकांना मोठे स्थान आहे. दरवर्षी विविध पातळ्यांवर बैठका होत असतात. वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यासाठी व काही वर्तमान विषयांवर मंथनासाठी समन्वय बैठकीचे नियमितपणे आयोजन होते. या बैठकीला संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित असतात. या बैठकीत वर्षभरातील कामावर प्रकाशझोत टाकण्यात येतो. सोबतच समन्वयाच्या दृष्टीने काही नियोजनदेखील करण्यात येते. भाजपचे प्रतिनिधीदेखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. भाजपकडून राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोबतच विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विद्याभारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री उपस्थित राहतील. दरम्यान गटश: बैठकांना मंगळवारपासूनच सुरुवात झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. कोरोनामुळे संख्येला मर्यादा

कोरोनामुळे मार्च २०२०पासून नागपुरात मोठ्या बैठकीचे आयोजन झालेले नाही. नागपुरात नियोजित असलेली अखिल भारतीय प्रतिनिधी सभादेखील बंगळुरू येथे घेण्यात आली. दरम्यान, दीड वर्षात सरसंघचालकांसह संघाचे विविध पदाधिकारी सातत्याने विविध क्षेत्रांमध्ये जाऊन बैठका घेत होते. एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात मोठी बैठक होते. मागील वर्षी कोरोनामुळे छोटेखानी बैठक झाली होती. यंदादेखील उपस्थितांची संख्या मर्यादित राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली. कोरोना नियंत्रणात आल्यावर २०२२च्या सुरुवातीला मोठी बैठक आयोजित करण्यात येणार आहे.