शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नागरी समस्यांच्या जाळ्यात नरसाळा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

रस्ते अर्धवट, गडरलाईन अपूर्ण : उद्यानांचा अभाव, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू ...

रस्ते अर्धवट, गडरलाईन अपूर्ण : उद्यानांचा अभाव, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात

नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरातील रस्ते चकाचक होत असल्याचा दावा केला जात आहे. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरविण्याचा दावा मनपातील पदाधिकारी व प्रशासनाकडून केला जात आहे. दुसरीकडे नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ‘लोकमत’ने नरसाळा भागातील समस्यांची पाहणी केली असता नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. या परिसरात रस्त्याची समस्या गंभीर आहे. परिसरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. गार्डनमध्येही कुठलीच व्यवस्था नाही. अशा एक ना अनेक समस्यांमुळे नरसाळावासी त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेच्या वतीने काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

गुलमोहरनगरात घाण पाणी विहिरीत

गुलमोहरनगरात गडरलाईन नाही. त्यामुळे शौचालयाचे पाणी नागरिकांच्या विहिरीत शिरत आहे. नागरिकांनी अनेकदा परिसरातील नगरसेवकांना तक्रारी केल्या. परंतु कुणीच या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. या भागात गार्डनसाठी जागा सोडली आहे. परंतु गार्डनमध्ये खेळणी नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. गार्डनमध्ये ग्रीन जीम आहे. मात्र तेथे गवत वाढल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होत नाही. गार्डनमध्ये घाण पाणी साचलेले असल्यामुळे तेथे उभे राहण्याचीही इच्छा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. गडरलाईनअभावी या भागातील विहिरी प्रदूषित होत असल्यामुळे महापालिकेने त्वरित गडरलाईनची व्यवस्था करून देण्याची गरज आहे.

भारतमाता नगरात पावसाचे पाणी घरात

भारतमातानगर तसेच चाणक्यपुरम सोसायटीत पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या भागात गार्डनमध्ये खेळणी नाहीत. त्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. पावसाळी नाल्या नसल्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते. परिसरात रस्ते उंचावर आणि नागरिकांची घरे खोलगट भागात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अधिक पाऊस आल्यास नागरिकांची गैरसोय होते. सगळीकडे पाणी साचते. या भागात अनेक रिकामे प्लॉट आहेत. या रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. तेथे डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेने रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

खराब रस्त्यांची जय अंबे सोसायटी

न्यू नरसाळा भागातील जय अंबे सोसायटीत रस्त्याची समस्या गंभीर आहे. या भागात बेसा पॉवर हाऊस ते न्यू नरसाळा रोडवर अर्धा सिमेंट रोड तयार करण्यात आला. परंतु अर्धा रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. परिसरात गडरलाईन नाही. त्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते. या भागात रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेकदा नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. परंतु या समस्यांकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे महानगरपालिकेने या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

वाहनचालकांची कसरत

‘जय अंबे सोसायटीत रस्त्याची समस्या गंभीर आहे. अर्धा सिमेंट रोड तयार झाला आहे. परंतु अर्धा रस्ता खोदून ठेवल्यामुळे गिट्टी रस्त्यावर पसरलेली आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. परिसरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.’

- प्रशांत ढवंगाळे, नागरिक

गडरलाईन तरी करा

गुलमोहर कॉलनीत गडरलाईन नाही. त्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरातील गार्डनमध्ये गवत वाढले आहे. गार्डनमध्ये लहान मुलांना खेळणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सेफ्टी टँकचे पाणी विहिरीत शिरत असल्यामुळे त्या दूषित होत आहेत.

- ताराचंद मेंढे, नागरिक

रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करा

भारतमातानगरात नागरिकांनी प्लॉट घेऊन ठेवले आहेत. रिकाम्या प्लॉटवर पावसाळ्यात पाणी साचते. या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे रिकाम्या प्लॉटधारकांवर महापालिकेने कारवाई करण्याची गरज आहे.

-राहुल डम्पलवार, नागरिक

सिव्हरेज लाईन महत्त्वाची

चाणक्यपुरम सोसायटीत सिव्हरेज लाईन नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात घाण पाणी परिसरात साचते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने परिसरात सिव्हरेज लाईनची व्यवस्था करण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करीत आहेत. परंतु अद्यापही ही मागणी पूर्ण करण्यात न आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

-संगीता रंगारी, गृहिणी

...............