‘त्या’ १९५५ मतदारांची नावे यादीतून वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:00+5:302021-06-24T04:08:00+5:30

काटोल : काटोल विधानसभा मतदारसंघांतर्गत काटोल व नरखेड तालुक्यात मतदार यादीचे ३२८ भाग आहेत. काटोल तालुक्यात ४६ ...

The names of 'those' 1955 voters will be removed from the list | ‘त्या’ १९५५ मतदारांची नावे यादीतून वगळणार

‘त्या’ १९५५ मतदारांची नावे यादीतून वगळणार

काटोल : काटोल विधानसभा मतदारसंघांतर्गत काटोल व नरखेड तालुक्यात मतदार यादीचे ३२८ भाग आहेत. काटोल तालुक्यात ४६ मतदारयादी भागात १२८४ मतदारांचे तर नरखेड तालुक्यात ३१ मतदार भागामध्ये ६७१ असे एकूण १९५५ मतदारांचे छायाचित्र नसल्याने त्याची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. अशा मतदारांचे छायाचित्र गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संबंधित मतदारांच्या पत्त्यावर जाऊन छायाचित्र गोळा करीत आहेत. यातील अनेक मतदार स्थलांतरित असल्याचे आढळून आले आहे. अशा मतदारांची नावांची यादी तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासोबतच दोन्ही तालुक्यातील विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना ही यादी देण्यात आली आहे. या मतदारांनी ३० जूनपर्यंत छायाचित्र जमा न केल्यास त्यांचे नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी दिली. काटोलचे तहसीलदार अजय चरडे याप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: The names of 'those' 1955 voters will be removed from the list