शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

नैवेद्यम इस्टोरिया सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

काम करणारे आठ कोरोना पॉझिटिव्ह : मंगल कार्यालय परिसर कन्टेन्मेंट क्षेत्र घोषित लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील ...

काम करणारे आठ कोरोना पॉझिटिव्ह : मंगल कार्यालय परिसर कन्टेन्मेंट क्षेत्र घोषित

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील मंगल कार्यालय, लॉन तसेच गर्दीची ठिकाणे हॉटस्पॉट ठरत आहेत. प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु त्यानंतरही नियमांचे पालन होत नसल्याने संसर्ग वाढत आहे. महापालिकेच्या लकडगंज झोन कार्यालयाने प्रभाग २४ मधील कळमना रोडवरील नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालयात काम करणारे आठ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मंगल कार्यालय १० मार्चपर्यंत सील केले आहे. तसेच हा परिसर कन्टेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या मंगल कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आदिवासी वसतिगृहात करण्यात आली. यात आठ कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती झोनच्या सहायक आयुक्त साधना पाटील यांनी दिली. यामध्ये स्वयंपाक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. स्वयंपाक करणारे कर्मचारी संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. नैवेद्यम सील करण्याची कारवाई साधना पाटील यांच्या मार्गदर्शनात झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी भेसारे, उपअभियंता अजय पझारे, कनिष्ठ अभियंता जगदीश बावनकुळे यांनी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी कोविड ड-१९ नियमांचे पालन न करणाऱ्या मंगल कार्यालयाविरोधात कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत चालला आहे. नागरिक मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन करताना दिसत नाहीत. मनपातर्फे मंगल कार्यालयाच्या विरोधात दररोज कारवाई करण्यात येत आहे.

...

नियम मोडून लग्न समारंभात गर्दी

कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून लग्न समारंभात फक्त ५० लोकांना परवानगी आहे. परंतु उपद्रव शोध पथकाने केलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी २००हून अधिक नागरिक उपस्थित होते. मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने १५ मंगल कार्यालय व लाॅनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

....

१५ मंगल कार्यालयांना १.५५ लाखाचा दंड

विवाह समारंभ व बाजारातील गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा कोविड संसर्ग होण्याचा धोका विचारात घेता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोमवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी दहा झोनमधील १५९ मंगल कार्यालये, लॉन यांची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन केल्याने १५ ठिकाणी कारवाई करून १ लाख ५५ हजारांचा दंड वसूल केला. यात लॉन, मंगल कार्यालयासोबतच शिकवणी वर्गाचा समावेश आहे.

....

१५९ मंगल कार्यालयांची तपासणी

झोन मंगल कार्यालय

लक्ष्मीनगर १२

धरमपेठ १४

हनुमाननगर ०८

धंतोली १९

नेहरूनगर ३२

गांधीबाग ०७

सतरंजीपुरा ०६

लकडगंज ११

आसीनगर २३

मंगळवारी २७

....