Nagpur: मामेबहिणीच्या लग्नातील संगीताला गेले अन चोरट्यांनी घर फोडले
By योगेश पांडे | Updated: November 23, 2023 18:36 IST2023-11-23T18:34:56+5:302023-11-23T18:36:42+5:30
Nagpur News: मामेबहिणीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमाला गेलेल्या एका तरुणाचे घर फोडत चोरट्यांनी दीड लाखांहून अधिकचा ऐवज लंपास केला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Nagpur: मामेबहिणीच्या लग्नातील संगीताला गेले अन चोरट्यांनी घर फोडले
- योगेश पांडे
नागपूर - मामेबहिणीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमाला गेलेल्या एका तरुणाचे घर फोडत चोरट्यांनी दीड लाखांहून अधिकचा ऐवज लंपास केला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सौरभ रमेश साहू (२५, कडू ले आऊट) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो व त्याच्या कुटुंबात आईवडील आहेत. मामेबहिणीचे लग्न असल्याने त्याचे आणखी एक मामा, मावशी व त्यांचे कुटुंबीय आले होते. २१ नोव्हेंबर रोजी लग्नस्थळी संगीताचा कार्यक्रम होता. त्यामुळे सगळे जण सायंकाळी साडेपाच वाजता नारा रोड येथे गेले. रात्री साडेदहानंतर ते घरी परतले असता घराचे कुलूप तुटले होते. चोरट्यांनी घरफोडी करत लोखंडी कपाटातून सोन्याचांदीचे दागिने व रोख ९० हजार असा १.६४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सौरभच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.