व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 12:30 IST2022-09-16T12:17:22+5:302022-09-16T12:30:30+5:30

नागपुरातील संतापजनक घटना

nagpur police arrested a man for sexual abuse of a young woman by threatening to make the video viral | व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नागपूर : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अनेक महिने अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. नंदकिशोर ऊर्फ नंदू मोरेश्वर उईके (३५, बाजारगाव, सावंगा) असे आरोपीचे नाव असून, गणेशपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पीडित तरुणी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. नंदू तिच्या घरी किरायाने राहत होता. त्याची तरुणी अल्पवयीन असतानापासूनच वाईट नजर होती. त्याने तिला स्वतःच्या जाळ्यात फसविले व जून २०२१मध्ये तिला गणेशपेठेतील जुन्या वस्तीतील एका घरात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यावेळी त्याने तिचा व्हिडीओ व फोटोदेखील काढले.

त्यानंतर हे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या प्रकाराला कंटाळून अखेर तरुणीने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. तरुणीने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली व पोलिसांनी नंदूविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Web Title: nagpur police arrested a man for sexual abuse of a young woman by threatening to make the video viral