नागपूर : मागील वर्षी मार्च महिन्यात महालात झालेल्या दंगलप्रकरणातील आरोपी व एमआयएम नगरसेविका अलिसा खान यांचा पती फहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे. दंगलप्रकरणात त्याच्याविरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी त्याला अटक करण्यात आली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.मागील वर्षी १७ मार्च रोजी महाल परिसरात दंगल उसळली होती. त्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंगदेखील करण्यात आला होता व मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती. त्यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमीदेखील झाले होते. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) फहीम खान हा या दंगलीचे सूत्रधार असल्याची बाब समोर आली होती. त्याच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तातडीने त्याचे घरदेखील पाडण्यात आले होते.पोलिसांनी तेव्हा फहीमला अटकदेखील केली होती. मात्र त्याच्याविरोधात गणेशपेठमध्ये एक व तहसील पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले होते. त्यातील एका गुन्ह्यात त्याला अटक झाली नव्हती. त्या प्रकरणाचा तपास तहसील पोलीस ठाण्यातून आर्थिक शाखेकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणात सुरुवातीला आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात फहीमला अटक न झाल्याने प्रश्न उपस्थित होत होते. अखेर तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी रात्री फहीमला ताब्यात घेतले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत घेतले जाईल.
संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्तात वाढदरम्यान, फहीम खानला अटक झाल्यानंतर त्याचे निवासस्थान तसेच संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्याचे समर्थक गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
गणेशपेठ पोलिसांनीदेखील केली होती अटकदरम्यान, दोन आठवड्यांअगोदर फहीमला गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या पथकानेदेखील अटक केली होती. मानकापूर येथील एका वादाच्या प्रकरणात त्याचे नाव आले होते. त्याचे नाव दंगलीतील गुन्ह्यात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानतंर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीतदेखील झाली होती.
Web Summary : Fahim Khan, accused in last year's Mahal riot case, has been arrested for investigation into one of five filed cases. Increased security measures implemented due to potential unrest among supporters. He was previously arrested in another case.
Web Summary : पिछले साल के महल दंगा मामले में आरोपी फहीम खान को पांच दर्ज मामलों में से एक की जांच के लिए गिरफ्तार किया गया है। समर्थकों के बीच संभावित अशांति के कारण सुरक्षा उपाय बढ़ाए गए। उन्हें पहले एक अन्य मामले में गिरफ्तार किया गया था।