शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १० ठिकाणी होणार खनिज सर्वेक्षण नागपूर, चंद्रपूर व यवतमाळचा समावेश :

By admin | Updated: May 12, 2016 02:58 IST

भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे २०१६-१७ मध्ये खनिज सर्वेक्षण समन्वेषणाच्या एकूण १० योजना राज्यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित केले आहे.

महाराष्ट्र राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची बैठकनागपूर : भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे २०१६-१७ मध्ये खनिज सर्वेक्षण समन्वेषणाच्या एकूण १० योजना राज्यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात चुनखडक, चंद्रपूर जिल्हा लोह खनिजासाठी, अहमदनगर, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील सामान्य सर्वेक्षण योजनांचा समावेश आहे.महाराष्ट्र राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची ५२ वी बैठक नागपूर येथे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व केंद्र शासनाच्या भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण विभाग व इतर यंत्रणेद्वारे कार्यसत्र २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र राज्यात केलेल्या भूवैज्ञानीय सर्वेक्षण व खनिज समन्वेषण कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच २०१६-१७ मध्ये संबंधित विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भूवैज्ञानीय कार्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीला भूविज्ञान आणि खनिकर्म विभागाचे, संचालक रा. शि. कळमकर, महाराष्ट्र सुदूर केंद्राचे डॉ. सुब्रतो दास, भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण विभागाचे चौधरी, नितनवरे, भारतीय खाण ब्यूरोचे ओ. पी. गोपाल. सी. एम. पी. डी. आयचे रेड्डी, राव, वेस्टर्न कोल फिल्डचे डॉ. रैना, मिनरल एक्स्फ्लोरेशन कॉपोर्रेशनचे शर्मा, मॅगनीज ओअर इंडिया लि. चे सरकार इत्यादी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. राज्य शासनाने खाणी व पूर्वेक्षणाच्या कामास प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी खाण व खनिजे (विकसन व नियमन) अधिनियम २०१५ च्या अनुषंगाने झालेल्या सुधारणांची माहिती देण्यात आली. खाण ब्लॉक लिलाव प्रक्रियेच्या परिस्थितीत बदल करून, अनुकूल बनवून उद्योजकांचा संभ्रम दूर केला. शासन खाण व पूर्वेक्षण कार्यास गती प्रदान करून जास्तीत जास्त खनिज क्षेत्रे लिलावाकरिता उपलब्ध करण्यासाठी कार्यरत आहे. या कामासाठी त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विभागाद्वारे केलेल्या पूर्वेक्षणाच्या कामाची प्रशंसा करून जास्तीत जास्त खनिज क्षेत्रे अल्प कालावधीत लिलावासाठी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे महाराष्ट्र राज्यात करण्यात आलेल्या खनिज सर्वेक्षण व समन्वेषण कार्याचा आढावा विशद करताना कार्यसत्र २०१६-१७ मध्ये संचालनालयाद्वारे करण्यात आलेल्या भूवैज्ञानीय कार्याची निष्पत्ती चुनखडक व होल खनिजाच्या लिलावाचे दृष्टीने राज्यात चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये सिद्ध करण्यात आली आहे.भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण व इतर केंद्र शासनाचे विभागाद्वारे कार्यसत्र २०१५-१६ मध्ये राज्यातील विविध भागात खनिजांकरिता भूवैज्ञानीय सर्वेक्षण करण्यात आले. या कामांच्या फलश्रुतीबाबत माहिती संबंधित विभागांनी या बैठकीत सादर केली. तसेच वर्षसत्र २०१६-१७ मध्ये भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण व इतर विभागाद्वारे राज्यात विविध खनिजांकरिता भूवैज्ञानीय सर्वेक्षण व पूर्वेक्षणाची प्रस्तावित कामांची माहितीही यावेळी देण्यात आली.(प्रतिनिधी)