शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात ‘केबल ड्रम’ चोरणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:32 IST

सदर परिसरातील रेसिडेन्सी रोड, मानकापूर आणि गिट्टीखदान रोडवरील लाखो रुपयाचे केबल ड्रम चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली.

ठळक मुद्देलोडिंग ट्रक, क्रेनसह कारने येऊन करायचे चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर परिसरातील रेसिडेन्सी रोड, मानकापूर आणि गिट्टीखदान रोडवरील लाखो रुपयाचे केबल ड्रम चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली. संदीप विक्टर लाल (४०) रा. छिंदवाडा, जामई, मो. आरिफ अन्सारी आणि लियाकत अली ऊर्फ सद्दाम अफजल अन्सारी (२८) रा. ताजनगर टेका अशी आरोपीची नावे आहे.
सदर येथील स्मृती टॉकीजसमोर फूटपाथवर ९ मार्च रोजी ५ लाख ३६ हजार रुपये किमतीचे ११ केव्हीचे आर्म्ड केबलचा ड्रम चोरीला गेला होता. फिर्यादी रोशन ब्राह्मणकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदरचे एपीआय अर्जुन घोडेपाटील यांच्या नेतृत्वातील डीबी चमूने या प्रकरणाचा शोध घेत असताना स्मृती टॉकीज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले. तेव्हा पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ९ मार्च रोजी रात्री ८ वाजता क्रेनच्या मदतीने ेएका ट्रकमध्ये केबल ड्रम ठेवले जात असल्याचे आढळून आले. यानंतर संबंधित ट्रक लेडीज क्लबजवळ दिसून आला. ट्रक क्रमांकाच्या आधारावर पोलीस एमआयडीसी परिसरात ट्रक व क्रेन भाड्याने देणारे व्यावसायिक विनोद यांच्यापर्यंत पोहोचले. व्यापारी विनोद यांनी जतीन वर्मा नावाच्या एका इंजिनियरला मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी कार, ट्रक व क्रेन भाड्याने दिल्याचे सांगितले. यानंतर ट्रक चालकाला विचारपूस केली असता केबलचे ड्रम ताजनगर टेका येथील कबाडी व्यापरी राशिद ऊर्फ मोनू अहमद नसीमुद्दीन मलीक (२७) याच्या गोदामात उतरविल्याचे सांगितले. कबाडी व्यापाऱ्याने केबल आरोपीकडून खरेदी केल्याचे सांगितले.

- बॉक्स..
क्रेनसह ४८ लाखाचे साहित्य जप्त
पोलिसांनी छिंदवाडा येथील आरोपी संदीप लाल आणि मो. आरीफला २२ मार्चला अटक केली. यानंतर पाचपावली ताजनगर येथील लियाकत अलीला अटक करण्यात आली. आरोपींनी सदर शिवाय गिट्टीखदान आणि मानकापूर परिसरातूनही केबल व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून केबल, रबरचे ट्यूब, इलेक्ट्रिक कटर, आणि ग्लँडर मशीन, मोबाईल, क्रेन (क्र. एमएच/३१/सीव्ही/५५२५), दहा चाकी ट्रक (एमएच/४०/३०७८) कार (एमपी/२८/सीए/६८९५)सह अ‍ॅल्युमिनिअम तार आदी ४८ लाखापेक्षा अधिक किमतीचे साहित्य जप्त केले.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक