शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलीवर जबरदस्ती करणाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - दारूच्या नशेत पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला मुलीच्या दिराने मारहाण करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - दारूच्या नशेत पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला मुलीच्या दिराने मारहाण करून त्याची हत्या केली. पिपळा हुडकेश्वर भागात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. हरिलाल मोहनलाल गोस्वामी (वय ५५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी नितीन नत्थूलाल सोळंकी आणि राजू हरिलाल राठोड या दोघांना ताब्यात घेतले.

मृत गोस्वामी हा मूळचा असिनपूर (लखनऊ, उत्तरप्रदेश) येथील रहिवासी होय. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरीत्या कमकुवत आहे. तिचा पती आणि त्याचे कुटुंबीय लॉकडाऊनपूर्वी गल्लोगल्ली फिरून चादर विकत होते. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्याने ते आता हातमजुरी करतात. लॉकडाऊनच्या दरम्यान गोस्वामी मुलीच्या घरी आला होता. काचेच्या वस्तू बनवून तो विकायचा. हा व्यवसाय चांगला चालत असल्याने तो मुलीच्याच घरी राहू लागला; मात्र छोट्याशा घरात अडचण होत असल्याने १५ दिवसांपूर्वी त्याला सुमनच्या कुटुंबीयांनी हुसकावून लावले. त्यामुळे बाजूच्याच एका पडक्या शेडमध्ये तो राहू लागला. तो सुमनलाही तेथे नेत होता. वडील असल्याने सुमनच्या कुटुंबीयांना संशय घेण्याचे कारण नव्हते. रविवारी सुमनच्या घरी जेवण बनविले. त्यामुळे वहिनी आणि तिच्या वडिलांना डबा देण्यासाठी सुमनचा दीर नितीन सोळंकी त्याचा मित्र राजू हरिलाल राठोडसोबत रविवारी रात्री १० च्या सुमारास शेडमध्ये आला. यावेळी दारूच्या नशेत टून्न असलेला गोस्वामी सुमनवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसला. ती विरोध करीत असल्याचेही नितीनने बघितले. त्याचा संताप अनावर झाला. नितीन आणि राजूने गोस्वामीची धुलाई सुरू केली. मारहाणीत तो जमिनीवर पडला. खाली दगड असल्याने गोस्वामीचे डोके ठेचले गेले. तो निपचित पडल्याचे पाहून आरोपी नितीन आणि राजू निघून गेले. दरम्यान, सोमवारी सकाळी गोस्वामीचा मृतदेह पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. हुडकेश्वरचे ठाणेदार प्रताप भोसले आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. तो हत्येचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर मृतदेह मेडिकलला पाठवून त्यांनी वरिष्ठांना कळविले. त्यानंतर परिमंडळ चारचे उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. सुमनकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी नितीन आणि राजूला ताब्यात घेतले. वृत्त लिहेस्तोवर पोलिसांची कारवाई सुरू होती.

---